Ration Card Google
बिझनेस

Ration Card: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! आजच हे काम करा अन्यथा मिळणार नाही मोफत धान्य

Ration Card KYC Deadline: रेशनकार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख आज आहे. रेशन कार्ड केवायसी केले नाही तर तुम्हाला मोफत धान्य मिळणार नाही.

Siddhi Hande

रेशनकार्ड धारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. रेशन कार्ड केवायसी करण्याची आजची शेवटची तारीख आहे. जर तुम्ही अजूनही केवायसी केले नसेल तर आजच करा. काही तासांतच तुम्हाला रेशन कार्ड केवायसी करण्याची मुदत संपणार (Ration Card KYC Deadline Today) आहे. यापुढे मुदत वाढणारदेखील नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जर तुम्ही केवायसी केले नसेल तर तुमचे रेशन कार्डवरुन नाव काढले जाणार आहे. तुम्हाला मोफत धान्य मिळणार नाही.

रेशन कार्ड केवायसी करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च होती. परंतु अनेकांना केवायसी केले नसल्याने ही मुदत अजून १ महिन्यासाठी वाढवण्यात आली. त्यामुळे आज रेशन कार्ड केवायसी करण्याची ही शेवटची तारीख आहे. लवकरात लवकर रेशन दुकानावर जाऊन केवायसी करुन घ्या. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीनेदेखील केवायसी करु शकतात.

रेशन कार्ड केवायसी करण्याची प्रोसेस (Ration Card KYC Process)

तुम्ही ऑफलाइन पद्धतीने रेशन दुकानावर जाऊन केवायसी करु शकतात. रेशन दुकानावर जाऊन तुम्हाला तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. तिथे तुमचे बायोमॅट्रिक पद्धतीने केवायसी केले जाईल.

केवायसी करण्याची ऑनलाइन पद्धत (Ration card kyc online process)

सर्वप्रथम तुम्हाला Aadhaar FaceRD हा अॅप डाउनलोड करायचा आहे.

यानंतर तुम्ही ज्या ठिकाणी राहतात ते ठिकाण

टाकायचे आहे.

यानंतर तुम्हाला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. तुमच्या फोनवर ओटीपी येईल तो टाका.

यानंतर Face-e-kyc हा ऑप्शन येईल. तो निवडा.

यानंतर तुमचा फोटो अपलोड करा. अशा पद्धतीने तुमचे केवायसी पूर्ण होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Maharashtra Live News Update: यमुना नदीचं पाणी घरात शिरलं - मथुरा

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

वाह रं पठ्ठ्या! ट्रेनच्या सीटवर झोपला; थंड हवेसाठी डोक्याच्या शेजारी कुलर ठेवला, देसी जुगाड पाहून सगळेच थक्क

SCROLL FOR NEXT