Raj Thackeray: उद्धव ठाकरेंपाठोपाठ राज ठाकरे जाणार शेतकऱ्यांच्या बांधावर, कसा असेल दौरा? VIDEO

Raj Thackeray Solapur Flood Visit: मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर जाणार असून पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या स्थितीची पाहणी करणार आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सोलापूर जिल्हा दौर्‍यावर जाणार आहेत. सीना नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची आणि शेतकऱ्यांच्या स्थितीची ते पाहणी करणार आहेत. कालच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्त भागाला भेट दिली होती. आता राज ठाकरे स्वतः त्या भागाचा दौरा करून शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत.

मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी यासंदर्भात माहिती दिली असून, पूरग्रस्तांना धीर देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी राज ठाकरे प्रत्यक्ष बांधावर उतरणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com