Surabhi Jayashree Jagdish
जन्मखूण (Birthmark) साधारणपणे आयुष्यभर तसेच राहतात. मात्र काही प्रकरणांमध्ये हे धोक्याचे संकेतही ठरू शकतात.
जर त्यामध्ये रंग, आकार किंवा संवेदनांमध्ये बदल दिसून आला तर त्याकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
तज्ज्ञांच्या मते सामान्य जन्मखूण वेदनारहित असतात. परंतु मोठ्या मेलॅनोसायटिक नेवस किंवा कॉग्निटम नेव्हीमुळे त्वचेच्या कॅन्सरचा धोका वाढू शकतो.
जन्मखुणेमध्ये काही बदल दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
जर जन्मखुणेचा आकार अचानक वाढत असेल, रंग बदलत असेल, खाज सुटत असेल, वेदना, लालसरपणा किंवा जळजळ जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका.
हे त्वचेच्या कॅन्सरचे सुरुवातीचे संकेत असू शकतात. त्यामुळे त्वरित डॉक्टरांकडे तपासणी करणे गरजेचे आहे.
जर जन्मखुणेच्या आसपास सतत खाज येत असेल, रंग व आकारात अचानक बदल होत असेल, वेदना, जळजळ किंवा त्वचेवर अनैसर्गिक बदल दिसत असतील.