Government Schemes  Saam Tv
बिझनेस

PPF, NPSच्या गुंतवणूकदारासाठी महत्त्वाची बातमी! ३१मार्चपर्यंत करा 'ही' कामे नाहीतर होईल नुकसान

Government Schemes : पीएफएफ, एनपीएस आणि सुकन्या समृद्धी या योजनांमध्ये पैसे गुंतवले आहेत का? आहेत तर ३१ मार्च २०२४ पूर्वी यात किमान पैसे गुंतवा, जर गुंतवणूक केली नाहीतर तुमचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

PPF, NPS Investors :

पीएफएफ, एनपीएस आणि सुकन्या समृद्धी या योजनेमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्हीही या योजनेत गुंतवणूक केली असेल तर ३१ मार्च २०२४ पूर्वी या योजनेत किमान रक्कम गुंतवा. जर असं नाही केलं नाही तर तुमचे खाते बंद करण्यात येईल. त्यानंतर पुन्हा खातं उघडण्यासाठी गुंतवणुकीच्या रकमेसह तुम्हाला शुल्क भरावे लागेल. भुर्दंड होऊ नये यासाठी पुढील ८ दिवसांमध्ये PPE, NPS आणि SSY मध्ये गुंतवणूक करा.(Latest News)

वेळेवर गुंतवणूक करा

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(ppf), नॅशनल पेन्शन सिस्टम(nps) आणि सुकन्या समृद्धी या योजनांमधील गुंतवणूकदारांना प्रत्येक आर्थिक वर्षात त्यांच्या खात्यात किमान रक्कम जमा करावी लागेल. या योजनांचे खाते सक्रिय ठेवण्यासाठी तुम्हाला प्रत्येक वर्षात काही रक्कम जमा करणे बंधनकारक आहे.जर तुम्ही किमान रक्कम जमा करण्यास टाळले तर तुमचे खाते बंद केले जाऊ शकते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तुम्ही पीपीएफमध्ये गुंतवणूक केली आहे का?

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (Public Provident Fund) ही भारतातील दीर्घकालीन गुंतवणूक योजनांपैकी एक आहे. या योजनेमध्ये तुम्ही दरवर्षी किमान ५०० ते १.५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. सरकार पीपीएफवरील व्याजदर ठरवत असते. सध्या त्यावर वार्षिक ७.१ टक्के व्याजदर लावण्यात आले आहे. पीपीएफचा लॉक-इन कालावधी १५ वर्षांचा आहे, ज्यामुळे गुंतवणूकदार १५ वर्षांपर्यंत पैसे काढू शकत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT