LIC च्या १ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारकडून पगारात भरघोस वाढ

LIC Employees: केंद्र सरकारने १ ऑगस्ट २०२२ पासून नोकरीला रुजू झालेल्या १ लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात १७ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. या वाढीबरोबरच एलआयसी कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची पगाराची थकबाकीही मिळणार आहे.
LIC Employees Salary Hike
LIC Employees Salary Hike
Published On

LIC Employees Salary Hike:

सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनीने कर्मचाऱ्यांच्या पगारात १७ टक्के वाढ करण्यास मंजुरी दिलीय. LIC कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय १ ऑगस्ट २०२२ पासून प्रभावी मानला जाईल. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे LIC च्या सुमारे १ लाख कर्मचारी आणि ३०,००० पेन्शनधारकांना दिलासा मिळणार आहे. दरम्यान कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीची माहिती एलआयसीने सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्म 'एक्स' पोस्ट करत दिलीय

केंद्र सरकारने १ ऑगस्ट २०२२ पासून नोकरीला रुजू झालेल्या १ लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात १७ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे. या वाढीबरोबरच एलआयसी कर्मचाऱ्यांना दोन वर्षांची पगाराची थकबाकीही मिळणार आहे. एलआयसी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीच्या निर्णयामुळे वार्षिक ४ हजार कोटी रुपयांचा आर्थिक बोजा वाढणार आहे. यासोबतच एलआयसीचा पगाराचा खर्चही २९,००० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

केंद्र सरकारने NPS मध्ये योगदान १० टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत वाढवले ​​आहे, म्हणजेच १ एप्रिल २०१० जी रुजू झालेल्या २४००० कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. दरम्यान सरकारने पेन्शनधारकांना एकरकमी भरपाई देण्यासही मान्यता दिली आहे. ही भरपाई एलआयसी पेन्शनधारक आणि कौटुंबिक पेन्शनधारकांना दिली जाईल

पगारवाढीबद्दल भारतीय आयुर्विमा महामंडळाने सरकारचे आभार मानले आहेत. निवडणूक आचारसंहिता शनिवार, आजपासून लागू होणार आहे, त्यामुळे निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी सरकारने LIC कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यास आणि पेन्शनधारकांना भरपाई देण्यास मान्यता दिली. यापूर्वी, ८.५० लाख सार्वजनिक क्षेत्रातील बँक कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीला मंजुरी देण्यात आली आहे.

LIC Employees Salary Hike
Provident Fund: नोकरी गेली तर PFची रक्कम काढता येते? कोण-कोणत्या कामांसाठी काढता येतात पैसे; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com