IIT  Saam tv
बिझनेस

IIT हैदराबादच्या विद्यार्थ्याची कमाल! अवघ्या २१व्या वर्षी मिळालं २.५ कोटींचं पॅकेज; सर्व रेकॉर्ड मोडले

IIT Hyderabad Student Get 2.5 Crore Package: आयआयटी हैदराबादच्या विद्यार्थ्याने रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. त्याला नेदरलँडच्या एका कंपनीत २.५ कोटीच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे.

Siddhi Hande

IIT हैदराबादच्या विद्यार्थ्याची कमाल

नेदरलँडच्या कंपनीत मिळवली २.५ कोटी पॅकेजची नोकरी

आयआयटी हैदराबदचे आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडले

सध्या मार्केटमध्ये जॉब मिळवणं हे खूप मोठं काम आहे. स्पर्धा खूप जास्त वाढत आहे त्या तुलनेने नोकरीची संख्या कमी आहे. याचसोबत तरुणांना जो पगार अपेक्षित आहे तो मिळत नाही. त्यामुळे अनेक तरुणांची निराशा होते. परंतु अशातच तरुणांसाठी प्रेरणा देणारी बातमी समोर आली आहे. सध्याच्या मार्केटमध्येही आयआयटीच्या एका तरुणांने २.५ कोटींच्या पॅकेजची नोकरी मिळवली आहे.

IIT हैदराबादचे सर्व रेकॉर्ड मोडले

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी म्हणजेच आयआयटी हैदराबादमध्ये कॉम्प्युटर सायन्स इंजिनियरिंगच्या विद्यार्थ्याने ही कामगिरी केली आहे. त्याला नेदरलँडमधील एका कंपनीने २.५ कोटी पॅकेजची ऑफर दिली आहे. IITH नुसार, २००८ पासून सुरु झालेल्या या संस्थेत पहिल्यांदाच एवढ्या पॅकेजची नोकरी कोणाला तरी मिळाली आहे. या तरुणाला सर्वाधिक पॅकेज मिळालं आहे.

२ महिन्याची इंटर्नशिप अन् २.५ कोटींची ऑफर

एडवर्ड नाथन वर्गीज असं या तरुणाचं नाव आहे. तो इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला आहे. त्यांने जुलै महिन्यात जागतिक ट्रेडिंग फर्म ऑप्टिवरमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम सुरु केले. याच २ महिन्यांच्या इंटर्नशिपमध्येच त्याला प्री प्लेसमेंट ऑफर मिळाली.

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, वर्गीसने सांगितले की, ही पहिली आणि एकच कंपनी आहे जिथे मी इंटरव्ह्यू दिा होता. जेव्हा माझ्या वरिष्ठांनी मला सांगितले की, कंपनी तुला प्लेसमेंट ऑफर देईल. त्यावेळी मला आणि माझ्या कुटुंबाला खूप आनंद झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Surya Gochar 2026: सूर्याचं बॅक टू बॅक 3 वेळा संक्रमण; फेब्रुवारी महिन्यात 'या' 5 राशींचं नशीब पालटणार

पालघरमध्ये तारेच्या कुंपणात बिबट्या अडकला, परिसरात भीतीचं वातावरण, VIDEO

Shirdi Sai Baba : शिर्डीत साई बाबांना तब्बल 1 कोटींचा सुवर्ण मुकूट, video

भाजपच्या पाठिंब्यामुळे शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर; कुणी कोणावर आरोप केले? वाचा

वंदे भारत स्लीपर आणि अमृत भारत ट्रेनचं तिकीट रद्द करायचंय? जाणून घ्या रेल्वेचे नियम,नाहीतर होईल नुकसान

SCROLL FOR NEXT