Marathi Actor : "सण साजरे करा, पण..."; DJ बंदीवर मराठमोळा अभिनेता स्पष्टच बोलला

Marathi Actor On DJ Ban Controversy : मराठमोळ्या अभिनेत्याने डीजे बंदीच्या मुद्द्यावर आपले स्पष्टच मत मांडले आहे. आपल्या सणांचे वैशिष्ट्य आणि गांभीर्य समजून जबाबदारीने सण साजरे करण्याचा संदेश त्यांनी दिला.
Marathi Actor On  DJ Ban Controversy
Marathi ActorSAAM TV
Published On
Summary

डीजेच्या मुद्द्यावरून राज्यभरात वातावरण तापले

मराठमोळ्या अभिनेत्याने डीजे बंदीवर दिली प्रतिक्रिया

अभिनेत्याचा सणांबाबत महत्त्वाचा संदेश

साम टिव्ही प्रतिनिधी - पराग ढोबळे

डीजेच्या मुद्द्यावरून आता राज्यभरात वातावरण तापले आहे. विशेषतः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला उत्सवाचा जल्लोष, मिरवणुका यांचा प्रश्न आहे, तर दुसऱ्या बाजूला ध्वनिप्रदूषण, नागरिकांचे आरोग्य आणि कायद्याचे पालन याबाबत चिंता व्यक्त होत आहे, यामुळे राजकारण देखील तापले आहे. काहींनी डीजे बंदीची मागणी केली आहे. अशात मराठी अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मराठी आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदे डीजे बंदीवर म्हणाला की, "सण साजरे करायलाच पाहिजे, पण लोकांना त्रास होऊ नये, सण साजरे करायची वेगवेगळी पद्धत आहे, आपल्या सणांचे वेगळे वैशिष्ट्य आहे, त्याचे वेगळे गांभीर्य आहे, ते समजून लोकांना त्रास झाला नाही पाहिजे असे सण साजरे करायला पाहिजे..."

अभिनेता श्रेयस तळपदेने महाराष्ट्रात घडणाऱ्या वेगवेगळ्या विषयांवर आपले मत दिले आहे. श्रेयस तळपदे मराठी भाषा सक्तीवर म्हणाला की, "मुंबईच नाही तर महाराष्ट्रात मराठी बोलायला काय प्रॉब्लेम आहे, मी अजून कुठे गेलो तर तिथली भाषा शिकतो, मी 'इकबाल'ची शूटिंग दरम्यान हैदराबाद मध्ये गेलो होतो तेंव्हा थोडी-थोडी तेलगू शिकलो होतो, आपण जिथे राहतो, जिथे काम करतो तिथली भाषा शिकायला काय हरकत आहे."

Marathi Actor On  DJ Ban Controversy
Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

सध्या बॉक्स ऑफिसवर 'हनुमान अंश' (Hanuman Ansh) चित्रपटाची तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. यावर श्रेयस म्हणाला की, "लोकांच्या हृदयाला भिडणारी स्टोरी असली की चित्रपट चांगला व्यवसाय करतो, हनुमान अंश या चित्रपटाची कहाणी लोकांच्या हृदयाला भिडणारी आहे, माझ्या मते चौथ्या आठवड्यात चांगला बिजनेस करत आहे, शोले पूर्वी आपण असे ऐकले होते, ही बाबांची कृपा आहे... "

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com