LinkedIn News Saam Tv
बिझनेस

LinkedIn News: नोकरी हवी तर AI चं ज्ञान हवं; २०२५ मध्ये वाढणार एआय टूल्‍स मागणी

LinkedIn News: व्यवसायांना कामाच्‍या ठिकाणी परिवर्तनांमधून नेव्हिगेट करण्‍यास मदत करण्‍यासाठी एचआर व्‍यवसायिकांवरील अवलंबन वाढण्‍यासह लिंक्‍डइन नवीन एआय-पॉवर्ड टूल्‍स सादर करत आहेत.

Tanvi Pol

कामाच्‍या ठिकाणी परिवर्तनाला अनपेक्षितपणे गती मिळत असताना लिंक्‍डइनच्‍या पहिल्‍याच वर्क चेंज स्‍नॅपशॉटच्‍या नवीन डेटामधून निदर्शनास येते की, २०२४ मध्‍ये जागतिक स्‍तरावर नियुक्‍त करण्‍यात आलेल्‍या १० टक्‍के कर्मचाऱ्यांकडे असे रोजगार आहेत, जे २००० मध्‍ये अस्तित्‍वात नव्‍हते. सस्‍टेनेबिलिटी मॅनेजर, एआय इंजीनिअर, डेटा सायण्टिस्‍ट, सोशल मीडिया मॅनेजर आणि कस्‍टमर सक्‍सेस मॅनेजर अशी पदे आता सामान्‍य आहेत.

महामारीच्‍या काळात वर्क फ्रॉम होम धोरणाबाबत पुनर्विचार करणाऱ्या कंपन्‍या असोत, नवीन तंत्रज्ञान (Technology) उदयास येत असो किंवा शाश्‍वततेवर अधिक फोकस असो लिंक्‍डइनच्‍या वर्क चेंज स्‍नॅपशॉटमधून आधुनिक काळातील कामाच्‍या ठिकाणांमध्‍ये काही वर्षांपूर्वीच्‍या तुलनेत सध्‍या झालेल्‍या परिवर्तनाला निदर्शनास आणते. आणि परिवर्तनाची गती अधिक वाढत जाण्‍याची अपेक्षा आहे. ५,००० हून अधिक जागतिक व्‍यवसाय प्रमुखांच्‍या संशोधनामध्‍ये लिंक्‍डइन निदर्शनास आणते की, भारतातील ८२ टक्‍के प्रमुख कामाच्‍या ठिकाणी परिवर्तनाला (change)गती मिळाल्‍याचे मान्‍य करतात.

जागतिक व्‍यवसाय प्रमुखांनी जनरेटिव्‍ह एआयची परिवर्तनात्‍मक क्षमता ओळखली आहे, जेथे भारतातील १० पैकी ९ व्‍यवसाय प्रमुख सांगतात की तंत्रज्ञानामुळे त्‍यांच्‍या टीम्‍सना फायदा होऊ शकतो. १० पैकी ७ व्‍यवसाय प्रमुख २०२५ मध्‍ये एआय टूल्‍स अवलंबण्‍याला अधिक प्राधान्‍य देत आहेत. एआयच्‍या अवलंबतेचा फायदा म्‍हणजे उत्‍पादकतेमध्‍ये वाढ होईल. लिंक्‍डइन डेटामधून निदर्शनास येते की, जनरेटिव्‍ह एआयमध्‍ये निपुण कर्मचारी प्रोफेशनल नेटवर्किंग, वैयक्तिक ब्रँडिंग, डिझाइन विचारसरणी व सर्जनशीलता आणि भावनिक बुद्धिमत्ता अशी आवश्‍यक सॉफ्ट स्किल्‍स विकसित करण्‍याची शक्‍यता २० पट अधिक आहे.

हे प्रमुख गुण आजच्‍या स्‍पर्धात्‍मक कामाच्‍या ठिकाणी यशस्‍वी होण्‍यासाठी आवश्‍यक आहेत. खरेतर, भारतातील टॉप पाच लिंक्‍डइन लर्निंग कोर्सेस या महत्त्वपूर्ण सॉफ्ट स्किल्‍ससह कम्‍युनिकेशन फाऊंडेशन्‍स आणि बिल्डिंग ट्रस्‍ट यावर लक्ष केंद्रित करतात. कम्‍युनिकेशन स्किल्‍स फॉर मॉडर्न मॅनेजमेंट आणि द मॅनेजर्स गाइड टू डिफिकलट कन्‍वर्जेशन्‍स अशा कोर्सेसच्‍या लोकप्रियतेमधून वरिष्‍ठ पदांसाठी या कौशल्‍यांची वाढती मागणी दिसून येते.

लिंक्‍डइन टॅलेंट सोल्‍यूशन्‍सच्‍या भारतातील प्रमुख रूची आनंद (Ruchee Anand, India Head, LinkedIn Talent Solutions) म्‍हणाल्‍या, “एआयमुळे कामाच्‍या ठिकाणी अभूतपूर्व परिवर्तन घडून येत आहे. भारतातील जवळपास २० टक्‍के व्‍यावसायिकांना त्‍वरित होत असलेल्‍या परिवर्तनाचा प्रभाव दिसून येत असला तरी अधिकाधिक कंपन्‍यांना या परिवर्तनामधून नेव्हिगेट करण्‍याप्रती कटिबद्ध असल्‍याचे पाहून प्रेरणादायी वाटत आहे. आम्‍ही २०२५ कडे वाटचाल करत असताना व्‍यवसाय एआय अवलंबतेला, तसेच त्‍यांच्‍या कर्मचाऱ्यांचे अपस्किलिंग व रिस्किलिंगमध्‍ये अर्थपूर्ण गुंतवणूकांना मोठ्या प्रमाणात प्राधान्‍य देत आहेत. एआयचा अवलंब विद्यमान गती कायम ठेवण्‍यासाठी, तसेच टीम्‍सचे सक्षमीकरण, नाविन्‍यतेला चालना आणि प्रगती करण्‍यास सज्‍ज असलेले कर्मचारीवर्ग निर्माण करण्‍यासाठी आवश्‍यक आहे. कंपन्‍यांनी एआयमध्‍ये निपुण होण्‍याची, कौशल्‍य विकासाप्रती कटिबद्ध राहण्‍याची आणि भावी कामाच्‍या पद्धतीमध्‍ये आत्‍मविश्‍वासाने नेतृत्‍व करण्‍याची वेळ आली आहे.''

लिंक्‍डइनकडून नवीन एआय-पॉवर्ड टूल्‍सची घोषणा

व्‍यवसायांमध्‍ये झपाट्याने बदलत असलेल्‍या विश्‍वाशी जुळवून घेण्‍याची स्‍पर्धा सुरू असताना एचआर टीम्‍स या परिवर्तनासंदर्भात मार्गदर्शन करण्‍यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. भारतात, ६९ टक्‍के एचआर व्‍यावसायिक सांगतात की कामाच्‍या ठिकाणी त्‍यांच्‍या अपेक्षा उच्‍च आहेत. तसेच, १० पैकी ६ एचआर व्‍यावसायिक मान्‍य करतात की स्‍पर्धात्‍मक राहण्‍यासाठी फक्‍त अनुभव पुरेसा नाही, तर अर्ध्‍याहून अधिक व्‍यावसायिक सांगतात की त्‍यांचा करिअर विकास एआयचा अवलंब करण्‍यावर अवलंबून आहे.

आपले पहिले जनरेटिव्‍ह एआय हायरिंग अनुभव रिक्रूटर २०२४ (Recruiter 2024) लाँच केल्‍यापासून लिंक्‍डइनने नियोक्‍त्‍यांना जलदपणे पात्र उमेदवारांचा शोध घेण्‍याचे त्‍यांचे ध्‍येय पूर्ण करण्‍यास मदत केली आहे. एचआर टीम्‍सना त्‍यांच्‍या सर्वात धोरणात्‍मक, कर्मचारी-केंद्रित टास्‍क्‍सवर लक्ष केंद्रित करण्‍यास मदत करण्‍यासाठी लिंक्‍डइनने नवीन एआय उत्‍पादने आणि टूल्‍सच्‍या लाँचची घोषणा केली आहे.

लिंक्‍डइनचा पहिला एआय एजंट हायरिंग असिस्‍टण्‍ट रिक्रूटर्सच्‍या वारंवार कराव्‍या लागणाऱ्या टास्‍क्‍समध्‍ये मदत करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आला आहे, ज्‍यामुळे ते त्‍यांचे सर्वात प्रभावी काम जसे हायरिंग व्‍यवस्‍थापकांचा सल्‍ला देणे, उमेदवारांशी कनेक्‍ट होणे आणि अपवादात्‍मक उमेदवार अनुभव निर्माण करणे यावर अधिक वेळ व्‍यतित करू शकतात. आजपासून, रिक्रूटर्स उमेदवार शोधणे व अर्जाचे पुनरावलोकन यांसारखी वेळ-खाऊ टास्‍क्‍स हायरिंग असिस्‍टण्‍टला सोपवू शकतो. रिक्रूटर्स या टास्क्‍सवर कमी वेळ व्‍यतित करू शकतील, तसेच संपूर्ण प्रक्रियेवर नियंत्रण ठेवू शकतील.

नियोक्‍ते संपूर्ण प्रक्रियेदरम्‍यान उमेदवारांबाबत अभिप्राय देऊ शकतील, ज्‍यामुळे हायरिंग असिस्‍टण्‍टला प्रत्‍येक रिक्रूटर्सच्‍या पसंतीबाबत सतत माहिती मिळेल आणि प्रत्‍येक नियोक्‍त्‍यासाठी अधिक वैयक्तिकृत बनेल. लिंक्‍डइनचा हायरिंग असिस्‍टण्‍ट आज ऑस्‍ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, भारत, मेक्सिको, फिलीपाइन्‍स, सिंगापूर व युनायटेड स्‍टेट्समधील एएमडी, कॅन्‍व्‍हा, सिमेन्‍स व झुरिक इन्‍शुरन्‍स अशा कंपन्‍यांतील रिक्रूटर्सच्‍या निवडक समूहासाठी चार्टरवर उपलब्‍ध आहे. तसेच, हायरिंग असिस्‍टण्‍ट आगामी महिन्‍यांमध्‍ये अतिरिक्‍त जागतिक ग्राहकांसाठी सादर करण्‍यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

Pandharpur : विठुरायाच्या पद स्पर्शासाठी ५ किमीपर्यंत लांबच लांब रांगा | VIDEO

Maharashtra Live News Update: भारंगी नदीत वृद्धाने घेतली उडी; घटना सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद

SCROLL FOR NEXT