Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: CAT परीक्षेत ९९ टक्के, लाखोंच्या पॅकेजची नोकरी सोडली, जिद्दीवर IAS झाली; महाराष्ट्राच्या लेकीची यशोगाथा वाचा...

IAS Neha Bhosale Success Story: महाराष्ट्राची नेहा भोसले यांनी आपल्या दुसऱ्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा क्रॅक केली. त्यांनी IM मधून MBA केलं होतं. त्यांना लाखो रुपयांचा पगार होता. तरीही त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली.

Siddhi Hande

मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाची स्वप्न पूर्ण होतात, असं म्हटलं जातं. असंच स्वप्न नेहा भोसले यांनीदेखील पाहिलं होतं. त्यांना इंग्लंडला जायचे होते. मात्र, त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळं होतं. परदेशात जाऊन शिक्षण घ्यायचे नोकरी करायचे असं स्वप्न पाहत असतानाच अचानक देशसेवा करण्याचा निर्णय घेतला अन् यूपीएससी परीक्षा दिली. आज नेहा भोसले या आयएएस म्हणून कार्यरत आहेत.

नेहा भोसले या मूळच्या मुंबईच्या रहिवासी. त्यांना लहानपणापासून डिटेक्टिव, आर्कियोलॉजिस्ट, लॉयर आणि नॉवेलिस्ट असं काही बनायचं होतं. त्या अभ्यासातदेखील खूप हुशार होत्या. त्यांना अमेरिकेला जायचे होते. म्हणून त्यांनी इन्फोर्मेशन टेक्नोलॉजीमध्ये बीटेक केले. त्यानंतर पुढे एमबीए करण्याचा निर्णय घेतला.(IAS Neha Bhosale Success Story)

एमबीएसाठी (MBA CAT) त्यांनी कॅट परीक्षा दिली. त्यात त्यांनी ९९.३६ स्कोर मिळाला. त्यांनी आयआयएम लखनऊमधून दोन वर्षांचा एमबीएचा कोर्स पूर्ण केला. या काळात त्यांनी अनेक ठिकाणी इंटर्नशिप पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी नोकरी सुरु केली. याच काळात त्यांची ओळख यूपीएससीच्या विद्यार्थ्यांशी झाली. त्याच वर्षी यूपीएससी टॉपर गौरव अग्रवाल आयआयएम लखनऊमधून पास आउट होते. त्यामुळेच नेहा यांना यूपीएससी परीक्षा देण्याची प्रेरणा मिळाली.

नेहा भोसले या चांगल्या पगाराची नोकरी करत होत्या. २०१६ साली त्या मित्रांसोबत रामेश्वरम येथे रोड ट्रिपवर गेल्या. तिथेच त्यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी केली. (Success Story)

याच काळात त्यांच्या जीमॅट परिक्षेचा निकाल लागला होता. त्यानंतर त्या एक वर्ष एमबीए करु शकत होत्या. परंतु त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्धार केला. पहिल्या वर्षात त्यांनी नोकरी करुन परिक्षेची तयारी केली. त्यावेळी त्यांना अपयश आले. परंतु त्याच्या पुढच्या वर्षी त्यांनी नोकरी सोडून यूपीएससीचा अभ्यास केला.

नेहा भोसले यांनी २०१९ मध्ये यूपीएससी परिक्षेत १५ वी रँक मिळाली. त्यांनी आयुष्यात अपयश आले म्हणून त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा प्रयत्न केला आणि त्या यशस्वी झाल्या. (IAS Officer Success Story)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Peanut Chutney Recipe : नाश्त्याला बनवा शेंगदाण्याची झणझणीत ओली चटणी; डोसा,वडा,इडलीची चव वाढवेल

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Mozambique Accident : मोठी दुर्घटना, समुद्रात बोट उलटली, ३ भारतीयांचा मृत्यू, ५ बेपत्ता

Central Railway Mega Block: मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवारी मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; घराबाहेर पडताना वेळपत्रक वाचा

OPPO Find X9 Series: येणार येणार तुमचा फोटो भारीच येणार! दमदार कॅमेरावाला OPPO Find X9 Series च्या लॉन्चची तारीख आली समोर

SCROLL FOR NEXT