IAS Ayush Goyal Saam Tv
बिझनेस

IAS Ayush Goyal : २८ लाखांची नोकरी सोडली, जिद्दीने UPSC ची तयारी, एका झटक्यात IAS झाला; आयुष गोयलची सक्सेस स्टोरी वाचाच

IAS Ayush Goyal Success Story: स्वप्न बघितल्यावर ते पूर्ण करण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. अशीच मेहनत दिल्लीच्या आयुष गोयल यांनी घेतली आहे. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली आहे.

Siddhi Hande

आयुष्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत हा एकच पर्याय असतो.यूपीएससी ही सर्वात कठीण परीक्षा आहे. यूपीएससी परीक्षा पास करुन सरकारी विभागात अधिकारी होण्याचे स्वप्न अनेक तरुणांचे असते. असंच स्वप्न दिल्लीच्या आयुष गोयल यांनी पाहिलं. आयुष गोयल यांनी १८ लाखांची नोकरी सोडून यूपीएससीची परीक्षा दिली अन् आज आयएएस ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.

दिल्लीत राहणारे आयुष गोयल यांनी एमबीए पदवी प्राप्त केली आहे. आयुष गोयल यांनी एमबीए कॅटची परीक्षा पास केली. त्यानंतर त्यांना लाखो रुपयांचे पॅकेज मिळाले. तरीही त्यांनी देशसेवा करण्याच्या उद्देशाने त्यांनी यूपीएससी परीक्षा दिली. (IAS Ayush Goyal)

आयुष गोयल यांनी यूपीएससी परीक्षेत ऑल इंडिया १७१ रँक प्राप्त केली आहे. त्यांनी प्रतिभा विकास विद्यालय या सरकारी शाळेतून शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी कॅट परीक्षेसाठी अभ्यास सुरु केला. त्यानंतर त्यांचे केरळमधील आयआयएम कोझिकोड येथे अॅडमिशन झाले. यानंतर एमबीए केल्यानंतर जेबी मॉर्गन या कंपनीत २८ लाख रुपये पगाराची नोकरी मिळाली.

आयुष यांनी लाखो रुपयांची नोकरी सोडून यूपीएससी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचे ८ महिने त्यांनी नोकरी केली. त्यानंतर त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यास सुरुवात केली. आयुष यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला. त्यांनी २० लाख रुपयांचे लोन घेऊन एमबीए पूर्ण केले होते. परंतु आपल्या मुलाचे आयएएस बनण्याचे स्वप्न आहे त्यामुळे त्यांनी मुलाला पाठिंबा दिला. (Ayush Goyal Success Story)

आयुष यांनी दहावीत ९१.२ टक्के मिळवले होते. १२वीत ९६.२ टक्के गुण मिळवले. त्यांनी यूपीएससीच्या पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. त्यांनी ऑल इंडियामध्ये १७१ रँक मिळवून उत्तम कामगिरी केली.

आयुष यांनी दिवसातून ८-१० तास अभ्यास केला. त्यांनी कोचिंग क्लासेस लावण्याऐवजी सेल्फ स्टडी करण्यार भर दिला. पुस्तके, ऑनलाइन माहिती याच्या मदतीने त्यांनी अभ्यास केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

Maharashtra News Live Update : नाशिक विधानपरिषद निवडणुकीत गोकुळ गीते यांचा विजय

Baba Bhide Bridge : पुण्यातील बाबा भिडे पूल ६ जुलैपर्यंत राहणार बंद, नेमकं कारण काय?

Vidhan Parishad Result 2026: महायुतीचा दणदणीत विजय, मविआची मते फुटली; सर्व १७ जागांचा संपूर्ण निकाल एकाच क्लिकवर

Weekly Horoscope: या राशींना जुन्या गुंतवणूकीतून फायदा होणार आहे, वाचा साप्ताहिक राशीभविष्य

SCROLL FOR NEXT