Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडिलांना UPSCत अपयश, लेकीने केले अपूरं स्वप्न पूर्ण; मेडिकलचे शिक्षण सोडून झाल्या IAS अधिकारी

IAS Mudra Gairola Success Story: आयएएस मुद्रा गैरोला या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयएएस अधिकारी झाल्या. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा पास केली.

Siddhi Hande

IAS मुद्रा गैरोला यांचा प्रेरणादायी प्रवास

वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झाल्या आयएएस

मेडिकले शिक्षण सोडले अन् दिली UPSC परीक्षा

देशातील सर्वात कठीण परीक्षा म्हणजे यूपीएससी. यूपीएससी परीक्षा पास करण्यासाठी दिवसरात्र एक करावी लागते. अनेकदा अपयश येते परंतु जिद्द असेल तर तुम्ही हे स्वप्न पूर्ण करु शकतात. असंच काहीसं आयएएस मुद्रा गैरोला यांच्यासोबत झालं. त्यांनी मेहनत आणि सातत्यच्या जोरावर आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

वडिलांचे अपूरं राहिलेलं स्वप्न केलं पूर्ण

मुद्रा गैरोला यांचे वडील अरुल गैरोला यांनी १९७३ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. मात्र, ते इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्ट झाले नाही. मात्र, त्यांच्या मनात आयुष्यभर हे स्वप्न तसंच होतं. हेच स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्यांच्या लेकीने घेतली आणि त्या आयएएस अधिकारी झाल्या.

मुद्रा या उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यातील कर्णप्रयागच्या आहेत. त्या लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होत्या. त्यांना दहावीत ९६ टक्के गुण मिळाले होते. १२वीच्या परीक्षेत ९७ टक्के मिळाले होते. त्यांना भारतातील पहिल्या महिला आयपीएस किरण बेदी यांच्या हस्ते शाळेत सन्मानित केले होते.

मेडिकलचे शिक्षण अर्धवट सोडले

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मुद्रा यांनी मुंबईत मेडिकल कॉलेजमध्ये बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये अॅडमिशन घेतले. त्यांनी गोल्ड मेडलदेखील जिंकले होते. यानंतर त्यांनी एमडीएसमध्ये अॅडमिशन घेतले. मात्र, याच काळात त्यांच्या वडिलांचे त्यांचे स्वप्न आठवले आणि त्यांनी लेकीला ते सांगितले. याचमुळे मुद्रा यांनी मेडिकलचे शिक्षण अर्धवट सोडले आणि यूपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली.

मुद्रा यांचा हा प्रवास सोपा नव्हता. त्यांनी २०१८ मघ्ये पहिल्यांचा परीक्षा दिली. मात्र,त्यांचे सिलेक्शन झाले नाही. त्यानी २०१९ मध्ये पुन्हा परीक्षा दिली. तरीही त्यांचे सिलेक्शन झाले. तिसऱ्यांदा २०२० मध्येही त्यांचे सिलेक्शन झाले. २०२१ मध्ये त्यांचे आयपीएस पदावर सिलेक्शन झाले. मात्र, त्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा २०२२ मध्ये परीक्षा दिली आणि ऑल इंडिया रँक ५३ प्राप्त केली. त्यानंतर त्या आयएएस अधिकारी झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

मुंबईनंतर पुण्यात तुफान राडा; शिंदे गटाच्या दोन गटाच्या २ उमेदवारांवर हल्ला, वडगाव शेरीत दगडफेक

Nashik Accident: नाशिक-पेठ महामार्गावर भीषण अपघात; दोन्ही कारचा चुराडा, ४ जणांचा जागीच मृत्यू, ६ गंभीर जखमी

Thursday Horoscope : स्वभावातला हेकेखोरपणा सोडा, नाहीतर...; ५ राशींच्या लोकांनी राहा सावधान

भाजपचा सत्तेसाठी अकोट पॅटर्न? विचारधारेला तिलांजली; AIMIM शी घरोबा, राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT