Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची कमाल! पहिल्या प्रयत्नात IPS, दुसऱ्या प्रयत्नात IAS अधिकारी, कोमल पुनिया यांचा प्रेरणादायी प्रवास

Success Story IAS Komal Punia: कोमल पुनिया यांनी दोनवेळा यूपीएससी परीक्षा पास केली. त्या पहिल्या प्रयत्नात आयपीएस आणि दुसऱ्या प्रयत्नात आयएएस अधिकारी झाल्या.
Success Story
Success StorySaam tv
Published On
Summary

कोमल पुनिया यांचा प्रेरणादायी प्रवास

पहिल्या प्रयत्नात आयपीएस, दुसऱ्या प्रयत्नात आयएएस अधिकारी

दुसऱ्या प्रयत्नात सहावी रँक प्राप्त

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देणे खूप अवघड असते. यूपीएससी परीक्षा पास करुन आयएएस आणि आयपीएस होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. दरम्यान, देशभरात लाखो लोक परीक्षा देतात. परंतु अनेकांना अपयश येते. परंतु कितीही अपयश आले तरीही हार मानायची नसते. दरम्यान, अनेकांनी दोनवेळादेखील यूपीएससी परीक्षा पास केली. असंच काहीसं कोमल पुनिया यांच्यासोबत झालं.

Success Story
Success Story: हालाखीची परिस्थिती, शाळेसाठी रोज ६ किमी पायपीट; मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IPS सरोज कुमारी यांचा प्रवास

कोमल पुनिया यांनी यूपीएससी परीक्षेत सहावी रँक प्राप्त केली. त्या आयएएस झाल्या. त्याआधी त्या आयपीएस झाल्या. यानंतर आयएएस बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. दोनदा त्यांनी यूपीएससी परीक्षा पास केली.

कोमल पुनिया यांनी पहिल्यांदा २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांना ४७४ रँक मिळाली. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससी परीक्षा पास केली. त्यांना सहावी रँक मिळाली.

पहिल्या प्रयत्नात मेन्समध्ये अपयश

२०२२ मध्ये त्यांनी पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. परंतु त्या मेन्स परीक्षा पास करु शकल्या नाहीत. यानंतर त्यांनी पुन्हा २०२३ मध्ये परीक्षा दिली. त्यामध्ये त्यांना यश मिळाले. यावेळी त्यांची आयपीएस ऑफिसर म्हणून निवड झाली.

Success Story
Success Story: दहावीत ५७ टक्के, शाळेतून काढून टाकले, तरीही जिद्दीने UPSC क्रॅक केली; IPS आकाश कुल्हरी यांचा प्रेरणादायी प्रवास

कोमल यांनी जवाहर नवोदय विद्यालयामधून शिक्षण घेतले. यानंतर २०२१ मध्ये आयआयटी रुडकीमधून इंजिनियरिंगची डिग्री प्राप्त केली. त्यांची दुसऱ्या प्रयत्नात आयपीएस पदावर निवड झाली. त्यानंतर आयएएस पदावर निवड झाली. त्यांचे बालपण ग्रामीण भागात गेले. त्यांचे वडील शेतकरी आहेत. शेतकऱ्याच्या लेकीने मोठ्या जिद्दीने यूपीएससी परीक्षा पास केली.

Success Story
Success Story: मुलीच्या यशाचं बापाचा उर भरुन आला; IPS लेकीला वडिलांना केला सॅल्यूट; सिंधू शर्मा यांचा भावनिक व्हिडिओ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com