प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात अपयश हे येतेच. कितीही अपयश आले तरीही जो व्यक्ती प्रयत्न करतो तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो. असंच यश गुजरातच्या कार्तिक जीवाणी यांना मिळालं आहे.
कार्तिक जीवाणी यांनी आयएएस ऑफिसर होण्याचे स्वप्न पाहिले होते.हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी आपले १०० टक्के योगदान दिले. सरकारी अधिकारी होण्यासाठी खूप कष्ट केले. तरीही त्यांना अनेकदा अपयश आले. त्यांनी ३ वेळा यूपीएससी परीक्षा दिली होती.ते तिन्ही प्रयत्नात यशस्वी झाले. परंतु ते आयपीएस अधिकारी झाले. त्यानंतर त्यांनी पुन्हा प्रयत्न केले आणि आयएएस अधिकारी झाले. (Success Story of IAS Kartik Jivani)
कार्तिक जीवाणी हे गुजरातच्या सुरतचे रहिवासी आहेत. त्यांनी आठवीपर्यंतचे शिक्षण गुजराती भाषेत केले. त्यानंतर त्यांनी इंग्रजी भाषेत अॅडमिशन घेतले. यानंतर १२वी पास केल्यानंतर JEE परीक्षा दिली. त्यानंतर आयआयटी मुंबईमधून इंजिनियरिंग पूर्ण केले.
कार्तिक जीवाणी यांनी इंजिनियरिंग करताना सिविल सर्व्हिस परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २०१६ साली यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी केली. त्यांनी २०१७ साली पहिला पहिल्यांदा यूपीएससी परीक्षा दिली. परंतु पहिल्या प्रयत्नात ते यशस्वी झाले. २०१८ साली कार्तिक जीवाणी यांनी आयपीएस झाले. परंतु त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा परीक्षा दिली. (IAS Officer)
कार्तिक जीवाणी यांनी २०२० साली चौथ्या प्रयत्नात ८वी रँक मिळवली. तेव्हा ते आयएएस झाले.त्यांनी आयपीएसच्या ट्रेनिंगदरम्यान १५ दिवसांची सुट्टी घेऊन आयएएस परिक्षेची तयारी केली. ते रात्र-रात्रभर अभ्यास करायचे. त्यांनी इंटरनेटवरुन अनेक स्टडी मटेरियल जमा केले होते. त्यातून त्यांनी नोट्स तयार केले होते.त्यांचे हे प्रयत्न त्यांच्या यशामागचं कारण आहे. (UPSC Success Story)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.