Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: वडिलांचे छत्र हरपले, आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिली UPSC; कोणत्याही क्लासशिवाय मिळवली दुसरी रँक; IAS गरिमा लोहिया यांचा प्रवास

Success Story of IAS Garima Lohia: आयएएस गरिमा लोहिया यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी यूपीएससी परीक्षेत दुसरी रँक मिळवली.

Siddhi Hande

यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. यूपीएससी (UPSC) परीक्षा देऊन आयएएस, आयपीएस अधिकारी होण्याचे सर्वांचेच स्वप्न असते. यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. अशीच मेहनत गरिमा लोहिया यांनी केली. त्यांनी यूपीएससी परीक्षा फक्त पास केली नाही तर त्यात ऑइल इंडिया २ रँकदेखील मिळवली.

गरिमा लोहिया या बिहारच्या बक्सरच्या रहिवासी. त्यांच्यासाठी यूपीएससी परीक्षा क्रॅक करण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्या बक्सरमध्येच मोठ्या झाल्या. त्यांच्या वडिलांचा बिझनेस होता. परंतु सर्वकाही नीट सुरु असताना काळाने घाला घालावा तसा त्यांच्या वडिलांच निधन झाले. २०१४ मध्ये वडिलांचे छत्र हरपले. त्यानंतर गरिमा आणि त्यांच्या आईने सर्वकाही सांभाळले.

गरिमा यांच्या आईचे त्यांनी आयएएस व्हावे, असे स्वप्न होते.त्यांनी आपल्या आईचे स्वप्न केले. त्यांनी यूपीएससी परीक्षेत दुसरी रँक मिळवली.

गरिमा यांचे शिक्षण

गरिमा यांनी सुरुवातीचे शिक्षण बक्सरमधून पूर्ण केले. त्यांनी दिल्ली युनिव्हर्सिटीमधून पदवी प्राप्त केली. ग्रॅज्युएशननंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

लॉकडाउनमध्ये अभ्यास

कोविडच्या काळात देशभरात लॉकडाउन होतो. तेव्हा त्यांनी या वेळेचा चांगला उपयोग करुन घेतला. कोणतेही क्लासेस न लावता त्यांनी फक्त ऑनलाइन आणि इतर पुस्तकांच्या आधारावर अभ्यास केला. त्यांनी युट्यूबवरुन तयारी केली. त्या पहिल्या प्रयत्नात नापास झाल्या होत्या.

दुसऱ्या प्रयत्नात थेट टॉपर

पहिल्या प्रयत्नात अपयश आले तरीही त्या खचल्या नाही. त्या उलट आणखी जास्त वेळ अभ्यास करत होत्या. त्यांनी दिवसभरात १२-१२ तास अभ्यास केला. त्यांनी खूप मेहनत घेतली. त्या मेहनतीचे फळ त्यांना मिळाले. त्यांनी यूपीएससी (UPSC) परीक्षेत दुसरी रँक मिळवली. त्या आयएएस म्हणून रुजू झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2025: ७ सप्टेंबरला दुर्मिळ चंद्रग्रहण, या ३ राशींना होणार भरपूर फायदा

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागच्या राजाची शेवटची आरती संपन्न

ITR Filling: आयटीआर फाइल करण्याची डेडलाइन वाढण्याची शक्यता, आतापर्यंत फक्त ४.५६ कोटी करदात्यांनी केलाय अर्ज

Ganesh Visarjan 2025: बाप्पाच्या विसर्जनाची मिरवणूकीत पायांची काळजी कशी घ्याल? हे उपाय करतील तुमची मदत

Baaghi 4 OTT Release : जबरदस्त ॲक्शन अन् रोमान्सचा धमाका, टायगर श्रॉफचा 'बागी ४' कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर येणार?

SCROLL FOR NEXT