Pune Home : पुणेकरांचे घर घेण्याचं स्वप्न महागलं, खरेदी-विक्रीचे दर वाढले, आजपासूनच अंमलबजावणी

Pune Home News : पुणेकरांचे घर घेण्याचे स्वप्न आणखी महागणार आहे, कारण खरेदी विक्रीच्या दरात सरकारकडून वाढ कऱण्यात आली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये घर घेण्याचा विचार करत असाल तर त्याआधी ही बातमी एकदा वाचाच...
Home Price Hike
Home Price HikeSaam Tv
Published On

Pune Home Price Hike : पुण्यात हक्काचे घर घेण्याचा विचार करत असाल, तर थांबा.. कारण घराच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. आजपासून पुण्यात खरेदी-विक्रीचे (Pune Real Estate Sees Price Hike) व्यवहाराचे दर वाढले आहेत. रेडीरेकनरमध्ये पुण्यात 4.16 तर पिंपरी चिंचवडमध्ये 6.69 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील घराच्या किंमती वाढणार आहेत.

राज्य सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी रेडीरेकनरमध्ये (खरेदी-विक्रीचे व्यवहाराचे) वाढ केली आहे. पुण्यात 4.16 तर पिंपरी चिंचवडमध्ये 6.69 टक्क्यांनी खरेदी-विक्रीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. रेडीरेकनर दर दोन वर्षांनी वाढल्याने शहरातील घरांच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. ही दरवाढ आजपासूनच लागू होणार आहे.

Home Price Hike
Home Price Hike: घराचे स्वप्न महागलं, आजपासून खरेदी-विक्रीचे व्यवहार महागले, कोणत्या शहरात काय स्थिती?

कोरोनामुळे एक एप्रिल 2020 ऐवजी सप्टेंबर 2020 मध्ये रेडी रेकनर दरात वाढ करण्यात आली होती.त्यानंतर 2021 22 या आर्थिक वर्षात रेडीरेकनरचे दर जैसे थे ठेवण्यात आले होते. कोरोनामुळे राज्याच्या आर्थिक स्थिती चांगली नसल्याने सन 2022 23 या वर्षात राज्यात रेडीरेकनर दरात वाढ करण्यात आली होती.त्यानंतर ची दोन वर्ष म्हणजे 23 24 आणि 24 25 या आर्थिक वर्षात रेडीरेकनर दर जैसे थे ठेवण्यात आला होते.2022 मध्ये 5.36% वाढ करण्यात आली होती.

सरत्या आर्थिक वर्षात 2024-25 नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने 55 हजार कोटी रुपये उत्पन्नाची उद्दिष्ट ठेवले होते. 30 मार्च पर्यंत 57 हजार 422 कोटी रुपयांचा महसूल खरेदी विक्रीतून जमा झाला आहे. 30 मार्चपर्यंत 29 लाख 12 हजार 783 दस्त नोंदणी करण्यात आले आहे. काल शेवटच्या दिवशी झालेल्या व्यवहारातून नोंदणी मुद्रांक शुल विभागाकडे सुमारे 58 हजार कोटी रुपयांचा महसूल जमा होण्याची शक्यता आहे.

रेडीरेकनर दरवाढ, घर महागणार

राज्यात रेडीरेकनर दरात 4.39% वाढ झाली. मुंबईत 3.39% वाढ झाली तर मनपा क्षेत्रात 5.95%, ठाण्यात 6.26%, नाशिकमध्ये 7.32%, नवी मुंबईत 6.75%, सोलापुरात 10.17% व अमरावतीत 8.3% वाढ झाली. 2022-23 नंतर ही दरवाढ झाली आहे. 2025-26 पासून हे दर लागू होतील

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com