Success Story Saam Tv
बिझनेस

IIT, IIM मधून शिक्षण, लंडनमधील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडली, नवरा-बायको दोघेही बनले IAS; दिव्या मित्तल यांचा प्रवास

Success Story IAS Divya Mittal: आयएएस होण्यासाठी खूप अभ्यास करावा लागतो. आयएएस दिव्या मित्तल यांनी लंडनमधील लाखो रुपयांच्या पगाराची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

Siddhi Hande

आयुष्यात प्रत्येकाचे काही न काही स्वप्न असते. खूप मोठी गगनभरारी घ्यायची असते. कधीकधी परिस्थिती किंवा काही वेगळ्या गोष्टींमुळे स्वप्न मागे राहते. परंतु आपण कितीही मोठे झालो तरीही ते स्वप्न कायम आपल्या मनात असते. ते पूर्ण करण्यासाठी कोणत्याही वयाची मर्यादा नाही. तुम्ही कोणत्याही वयात हे स्वप्न पूर्ण करु शकतात.असंच काहीसं दिव्या मित्तल यांच्यासोबत झालं. त्यांनी यूपीएससी परीक्षेसाठी लाखो रुपये पगाराची नोकरी सोडली. (IAS Divya Mittal Success Story )

देशातील सर्वात अवघड परीक्षा क्रॅक (Divya Mittal Success Story)

दिव्या मित्तल यांनी आयआयटीमध्ये होणारी JEE Main आणि JEE Advanced परीक्षा क्रॅक केली. त्यानंतर IIM मध्ये प्रवेश घेण्यासाठी लागणारी CAT परीक्षादेखील क्रॅक केली. एवढे असतानाही त्यांनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी पहिल्या प्रयत्नात यूपीएससी क्रॅक केली तेव्हा त्या आयपीएस झाल्या. दुसऱ्या प्रयत्नात त्या आयएएस झाल्या.

लंडनमधील नोकरी सोडून IAS होण्यासाठी प्रयत्न (Left London Job Crack UPSC)

दिव्या मित्तल यांनी आयआयएममधून शिक्षण घेतल्यानंतर त्या लंडनमध्ये गेल्या. लंडनमध्ये त्यांनी चांगल्या पॅकेजची नोकरी केली. त्यानंतर पुन्हा भारतात येऊन यूपीएससी परीक्षेची तयारी केली.

दिव्या मित्तल यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९८३ रोजी झाला. त्यांनी आयआयटी दिल्लीमधून बीटेक केले. आयआयएम बंगळुरुमधून एमबीए केले. त्या मूळच्या हरियाणाच्या रेवाडी येथील रहिवासी आहेत.

दिव्या मित्तल यांचं लग्न झाल्यावर त्या लंडनला गेल्या. तिथे त्या जेपी मॉर्गन या कंपनीत काम करत होत्या. त्यांना लाखो रुपयांचे पॅकेज होते. परंतु त्या जोडप्याने भारतात परत येऊन यूपीएससी देण्याचा निर्णय घेतला. दिव्या मित्तल या २०१३ च्या बॅचच्या आयएएस आहेत. तर त्यांचे पती गगनदीप सिंह हे २०२१ च्या बॅचचे आयएएस आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rave Party: रेव्ह पार्टी म्हणजे नेमकं काय?

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

SCROLL FOR NEXT