Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: लहानपणी गाई चरायला घेऊन जायच्या, लग्नासाठी कुटुंबाकडून दबाव, तरीही मोठ्या जिद्दीने क्रॅक केली UPSC; IAS सी वनमथी यांचा प्रवास

Success Story of IAS C Vanmathi: आयएएस सी वनमथी यांचा यूपीएससीचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे. त्यांनी खूप जिद्दीने आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले.

Siddhi Hande

IAS सी वनमथी यांचा प्रेरणादायी प्रवास

लहानपणी गुर चरायला घेऊन जायच्या

आर्थिक परिस्थिती बेताची तरीही अभ्यासावर कोणताच परिणाम नाही

मोठ्या जिद्दीने क्रॅक केली यूपीएससी परीक्षा

प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही संघर्ष असतो. अनेकदा परिस्थिती वाईट असते. परंतु कितीही काहीही झालं तरीही आपण हार मानायची नसते. असंच काहीसं सी वनमथी यांनी केलं. घरची आर्थिक परिस्थिती बेताची, लहानपणी गाई गुरांना चरायला घेऊन जायच्या. तरीही खूप मेहनतीने शिक्षण घेतले. त्यांनी आपल्या कुटुंबाचे नाव मोठे केले. अनेक कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यांचे बालपण हे खूप कठीण परिस्थितीतून गेले. परंतु तरीही त्यांनी हार मानली नाही.

सी वनमथी यांच्या वडिलांनी कॅब चालवून घराचा खर्च उचलला. ते आर्थिकदृष्ट्या कमजोर होत्या. परंतु तरीही त्यांनी मुलीच्या शिक्षणात कोणतीही कसर सोडली नाही. आपली मुलगी मोठी होऊन अधिकारी व्हावी, असं त्यांचं स्वप्न होतं. आईवडिलांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली.

सी वनमथी या मूळच्या तामिळनाडूच्या रहिवासी.त्या अशा समाजातून येतात की जिथे मुलींच्या शिक्षणाला काही खास महत्त्व नव्हते. मुलींचे थेट लग्न करुन दिले जायचे. परंतु सी वनमथी यांनी या सर्व गोष्टी सोडून खूप मेहनत घेतली. त्यांनी आपली परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला.

लहानपणी त्या घरातील कामे करायचे. याचसोबत गाई गुरांना चरायला घेऊन जायच्या. परंतु असं असतानाही याचा कोणताही वाईट परिणाम त्यांच्या शिक्षणावर झाला नाही. कुटुंबाने त्यांच्यावर लग्न करण्यासाठी दबाव टाकला होता. परंतु तरीही त्यांनी बार मानली नाही. त्यांनी ग्रॅज्युएशनसोबत स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

सी वनमथी यांनी अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र एक केला. त्यांनी कधीच हार मानली नाही. त्यांनी २०१५ मध्ये यूपीएससी परीक्षा पास केली. यूपीएससी परीक्षेत त्यांनी १५२ रँक प्राप्त केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EVM: उंदराने भेदला स्ट्राँगरुमचा पहारा, स्ट्राँगरुमचा दरवाजा उघडला, राज्यात खळबळ

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला होणार मराठी पंतप्रधान'; पृथ्वीराज चव्हाणाचं वक्तव्य, राज्यात खळबळ

Mumbai Crime : खळबळजनक! मुंबईतील स्थानिक गुंडांकडून भररस्त्यात पोलिसांवर हल्ला

IND vs SA 3rd T20I: भारतीय 'धुरंधरां'चा करिष्मा; ७ विकेट राखत टीम इंडियाचा शानदार विजय, मालिकेत २-१नं आघाडी

ऐन पालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना बसणार मोठा धक्का; बड्या महिला नेत्या भाजपमध्ये प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT