Success Story Saam Tv
बिझनेस

Success Story: मातीच्या दिव्याखाली अभ्यास केला, कोणत्याही कोचिंगशिवाय एकदा नाही तर दोनदा UPSC क्रॅक; IAS अंशुमन राज यांचा प्रवास

Success Story of IAS Anshuman Raj: आयएएस अशुंमन राज यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. त्यांनी मातीच्या दिव्याखाली अभ्यास केला होता.

Siddhi Hande

आयएएस ऑफिसर होण्याचे अनेकांचे स्वप्न असते. आयएएस होण्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. यूपीएससी ही देशातील सर्वात अवघड परीक्षा आहे. ही परीक्षा देताना मेहनत आणि इच्छाशक्ती या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. असंच मेहनतीच्या जोरावर अशुंमन राज यांनी यश मिळवलं आहे.त्यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय हे यश मिळवलं आहे. (Success Story Of IAS Anshuman Raj)

अशुंमन राज (IAS Anshuman Raj) हे बिहारमधील बक्सर या गावातील रहिवासी. गावात लहानाचे मोठे झाल्यामुळे त्यांचे जीवन खूप साधे होते. त्यांनी १०वीपर्यंतचे शिक्षण जवाहर नवोदय स्कूलमधून केले. त्यानंतर जेएनवी रांची येथील बारावीपर्यंत शिक्षण केले. त्याचसोबत त्यांनी डिप्लोमादेखील केला. यानंतर त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यांचे बालपण खूप खडतर परिस्थितीत गेले. मिडिया रिपोर्टनुसार, त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण हे मातीच्या दिव्याखाली अभ्यास करत पूर्ण केले.

अशुंमन यांच्याकडे सुख सुविधा नव्हत्या परंतु जिद्द होती. या जिद्दीच्या जोरावर त्यांनी संघर्ष केला आणि त्यांना यशदेखील मिळाले. त्यांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होती. परंतु त्यांनी या सर्व गोष्टींवर मात करत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. ते आयएएस अधिकारी झाले.

अशुंमन राज यांनी कोणत्याही कोचिंग क्लासेसशिवाय हे यश मिळवले आहे. त्यांनी सेल्फ स्टडी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या प्रयत्नात त्यांना यश मिळाले आणि ते आयआरएस पदी कार्यरत झाले. परंतु त्यांना आयएएस व्हायचे होते. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा पुन्हा परीक्षा दिली. यावेळी ते आयएएस झाले.

आयएएस (IAS) होण्याआधी त्यांना दोनदा अपयश आले होते. परंतु आपलं काय चुकतंय हे लक्षात घेऊन त्यांनी त्यावर पुन्हा मेहनत घेतली. चौथ्या प्रयत्नात त्यांना ऑल इंडिया १०७ रँक मिळाली. अशुंमन यांच्या मते, जर तुमच्याकडे इंटरनेट असेल तर तुम्ही देशातील कोणत्याही कानाकोपऱ्यात बसून यूपीएससी परीक्षेचा अभ्यास करु शकतात. मेहनतीच्या जोरावर तुम्हाला यश हे मिळते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : चिंचपोकळीचा चिंतामणी विसर्जनासाठी मार्गस्थ

Fighting Viral Video: कारमध्ये बसवून धू धू धुतलं, आधी मुलीनं मारलं; नंतर मित्रानेच ९० सेकंदात २६ वेळा तरुणाच्या कानशिलात लगावल्या| पाहा VIDEO

Maharashtra Live News Update: मथुरेत पावसाचा हाहाकार, यमुना नदीचे पाणी घरात शिरलं

Gold Rate Today: आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचे दर वाढले; १० तोळ्यामागे ८,७०० रुपयांनी वाढ, वाचा आजचे भाव

Fruits For Kidney : आहारात या ६ फळांचा समावेश केल्यास मूत्रपिंडासाठी ठरतील वरदान, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT