Success Story: आधी DSP, त्यानंतर IRS अधिकारी, एकदा नाही तर दोनदा क्रॅक केली UPSC; IAS मयंक त्रिपाठी यांचा प्रवास

Success Story of IAS Mayank Tripathi: आयएएस मयंक त्रिपाठी यांनी एकदा नाही तर दोनदा यूपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे. ते आधी डीएसपी झाले. त्यानंतर त्यांची आयआरएस पदी निवड झाली. त्यानंतर त्यांनी यूपीएससी परीक्षेत १०वी रँक प्राप्त केली.
Success Story
Success StorySaam Tv
Published On

अनेकदा स्वप्नांच्या मागे धावत असताना आपल्याला अपयश येते. आपण आपले स्वप्न गाठत असतो तेच काहीतरी होतं अन् आपण अयशस्वी होतो. परंतु कितीही काहीही झालं तरीही हार मानायची नसते. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे यूपीएससी परीक्षा. यूपीएससी परीक्षेत अवघ्या २-४ गुणांनी अनेकांना अपयश मिळचे अन् आयएएस होण्याचे स्वप्न अर्धवट राहते. परंतु कितीही काहीही झालं तरीही जे व्यक्ती प्रयत्न करतात त्यांना नक्तकीच यश मिळते. असंच यश मयंक त्रिपाठी यांनीदेखील मिळाली. ते आयएएस होण्यासाठी डीएसपी आणि आयआरएस अधिकारी म्हणून कार्यरत होते.

Success Story
Success Story: अपयश आले पण हार मानली नाही, कोचिंग क्लासशिवाय UPSC क्रॅक, शेतकऱ्याची लेक झाली IAS, वाचा यशोगाथा

मयंक त्रिपाठी यांचं शिक्षण (IAS Mayank Tripathi Education)

मयंक त्रिपाठी हे मूळचे उत्तर प्रदेशमधील कनौज येथील रहिवासी आहे. मयंक यांनी सुरुवातीचे शिक्षण उत्तर प्रदेशमधून घेतले आहे. त्यानंतर ते शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी दिल्लीला गेले. यानंतर दिल्ली विद्यापीठातील हिंदू कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंगमध्ये डिग्री प्राप्त केली. त्यांचे वडी हे कनौजमध्ये जिल्हा मजिस्ट्रेट कार्यालयात कार्यरत आहेत. आई गृहिणी आहेत.

UPPCS देऊन बनले डीएसपी

मयंक यांनी लहानपणापासूनच अधिकारी देण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांनी २०२२ मध्ये यूपीपीएससी परीक्षा दिली होती. पहिल्याच प्रयत्नात ते डीएसपी बनले होते. परंतु त्यांना आयएएस अधिकारी व्हायचे होते. त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी नोकरी सोडली. त्यांनी २०२३ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. यात त्यांना ३७३ रँक प्राप्त झाली. त्यांचे आयआरएस अधिकारी म्हणून सिलेक्शन झाले.

Success Story
Success Story: MBBS केलं, १२ तासांची शिफ्ट करत UPSC चा अभ्यास, दुसऱ्या प्रयत्नात यश; IAS अंजली गर्ग यांचा प्रेरणादायी प्रवास

UPSC परीक्षेत १०वी रँक

मयंक यांचे स्वप्न आयएएस होण्याचे होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा यूपीएससी (UPSC) परीक्षा दिली. त्यांनी खूप मन लावून अभ्यास केला. त्यांनी २०२४ मध्ये यूपीएससी परीक्षेत १० रँक प्राप्त केली. त्यानंतर ते आयएएस अधिकारी म्हणून रुजू होतील.

Success Story
Success Story: आईपण भारी देवा! १६व्या वर्षी लग्न, नवऱ्याने मारलं, दोन मुलांसोबत घर सोडलं, IAS सविता प्रधान यांचा संघर्षमय प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com