Success Story: आईपण भारी देवा! १६व्या वर्षी लग्न, नवऱ्याने मारलं, दोन मुलांसोबत घर सोडलं, IAS सविता प्रधान यांचा संघर्षमय प्रवास

Success Story of IAS Savita Pradhan: आयएएस सविता प्रधान यांनी खूप संघर्ष केला होता. त्यांचे १६व्या वर्षी लग्न करण्यात आले होते. नवऱ्याने त्यांना खूप मारहाण केली त्यानंतर त्यांनी या नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
 IAS Savita Pradhan
IAS Savita PradhanSaam Tv
Published On

प्रत्येकाची काही न काही कहाणी असते. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष हा असतो. परंतु या संघर्षाकडे पाहून सतत रडण्यापेक्षा तुम्ही त्यातून मार्ग काढायला शिकायला हवे. असंच काहीसं आयएएस सविता प्रधान यांच्यासोबत झालं. सविता प्रधान यांनी सिंगल मदर असताना सर्वकाही सांभाळून यूपीएससी परीक्षा क्रॅक केली होती.

आयएएस सविता प्रधान यांचा प्रवास खूपच संघर्षमय आहे. सविता या मध्य प्रदेशमधील मंडई गावातील आदिवासी परिवारातील सदस्य आहेत. त्यांना खूप प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागला.

 IAS Savita Pradhan
Success Story: अमेरिकेतील नोकरी सोडली, घरी बनवून विकले पौष्टिक लाडू; आज कमावतो ५५ लाख रुपये; वाचा सक्सेस स्टोरी

सविता यांनी शाळेत स्कॉलरशिप मिळवून १०वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी ७ किलोमीटर लांब असलेल्या शाळेत अॅडमिशन घेतले. त्यांच्याकडे शाळेची फी भरायला पैसे नव्हते. त्यामुळे त्यांनी पार्ट टाइम नोकरी केली.

सविता यांनी सायन्समधून शिक्षण पूर्ण केले. तिला डॉक्टर व्हायचे होते. परंतु काही कारणाने ते शक्य झाले नाही. त्यानंतर सविता यांचे १६ व्या वर्षी लग्न झाले. त्यांच्या आईवडिलांनी १६ व्या वर्षी चांगल्या श्रीमंत घरात त्यांचे लग्न झाले होते. त्यांना हे लग्न करायचे नव्हते परंतु घरच्यांच्या दबावामुळे त्यांनी लग्न केले.

लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडून त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. त्यांना नवरा त्यांना खूप मारायचा,धमकी द्यायचा. दोन मुले झाल्यानंतरही त्यांना मारायचा. त्यानंतर सविता यांनी एकदिवस हिम्मत एकटवून घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. फक्त २७०० रुपये घेऊन त्यांनी दोन्ही मुलांना घेऊन घर सोडले.

सविता यांनी खर्च भागवण्यासाठी ब्युटी सलून उघडले. यात त्यांच्या आईवडिलांनी आणि भावंडांनी त्यांनी खूप साथ दिली.कामासोबतच त्यांनी भाोपाळमधील बरकतुल्लाह युनिव्हर्सिटीमधून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये बीए पूर्ण केले.

 IAS Savita Pradhan
Success Story: आदिवासी ते IAS, अजय डोकेंनी जव्हारचे नाव महाराष्ट्रात केले, गावकऱ्यांनी डोक्यावर घेत काढली मिरवणूक

यानंतर त्यांनी राज्या सिविल सेवा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी २४ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात परीक्षा पास केली. त्या मुख्य नगरपालिका अधिकारी म्हणून कार्यरत झाल्या.यानंतर त्यांना अनेक प्रमोशन मिळाले. त्या आज आयएएस म्हणून कार्यरत आहेत. यानंतर त्यांनी दुसरे लग्नदेखील केले. त्यांचे स्वतः चे हिम्मत वाली लडकिया नावाचे युट्यूब चॅनलदेखील आहे.

 IAS Savita Pradhan
Success Story: अभ्यास करता करता शेतीत राबला, एकदा दोनदा नव्हे तर तिनदा क्रॅक केली UPSC; शेतकऱ्याचा लेक झाला IAS

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com