HSRP Saam Tv
बिझनेस

HSRP नंबर प्लेट बसवण्याची शेवटची तारीख जवळ येतेय, ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करावं? वाचा सविस्तर

HSRP Number Plate Registration Last Date And Online Process: एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२५ आहे. यासाठी रजिस्ट्रेशन कसं करावं ते जाणून घ्या.

Siddhi Hande

HSRP प्लेट बसवण्याची शेवटची तारीख

२०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना HSRP प्लेट अनिवार्य

ऑनलाइन रजिस्ट्रेशन प्रोसेस

राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी (HSRP) नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. हाय सुक्युरिटी नंबर प्लेट सर्व वाहनांना असणे बंधनकारक केले आहे. जर तुम्ही ही नंबरप्लेट बसवली नाही तर तुम्हाला दंड बसू शकतो. दरम्यान, आता एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. आता तुम्ही १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत ही नंबर प्लेट लावू शकणार आहे.

२०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना ही नंबर प्लेट बसवायची आहे. त्यानंतरच्या वाहनांना आधीच एचएसआरपी नंबरप्लेट लावण्यात आली आहे. यासाठी वेगवेगळ्या एजन्सी काम करत आहेत. तुम्ही तुमच्या घराजवळील एजन्सीला भेट देऊन ही नंबरप्लेट बसवू शकतात. दरम्यान, यासाठी ऑनलाइन रजिस्ट्रेशन कसं करायचं ते जाणून घ्या.

HSRP नंबर प्लेट बसवण्याची ऑनलाइन प्रोसेस (HSRP Registration Online Process)

  1. सर्वप्रथम तुम्हाला transport.maharashtra.gov.in या वेबसाइटवर जायचे आहे.

  2. होमपेजवर गेल्यावर Apply High Security Registration Plate Online असा ऑप्शन दिसेल. त्यावर जाऊन ऑफस सर्च सिलेक्ट करा.

  3. यानंतर APPLY HSRP वर क्लिक करा. यानंतर Order HSRP टाकायचा आहे. यानंतर वाहनाचा रजिस्ट्रेशन नंबर, चेसीस नंबर आणि इंजिन नंबर टाकायचा आहे. याचसोबत मोबाईल नंबर टाका.

  4. यानंतर तुमच्यासमोर पेमेंटचा ऑप्शन येईल. दुचाकी, ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये भरायचे आहे. तीनचाकी वाहनांसाठी ५००, चारचाकी आणि इतर वाहनांसाठी ७४५ रुपये भरायचे आहे.

  5. ही प्रोसेस पूर्ण झाल्यावर तुम्हाला रिसिप्ट मिळेल. ती तूमच्याजवळ ठेवा.

  6. यानंतर तुम्हाला तुमच्या जवळच्या एजन्सीत जाऊन ही नंबर प्लेट बदलून घ्यायची आहे.त्यासाठी तुम्हाला वेळ दिली जाईल.

एचएसआरपी नंबर प्लेट म्हणजे काय? (What is HSRP Number Plate)


एचएसआरपी (High Security Registration Plate) ही एक नंबर प्लेट आहे. यामध्ये विशेष कोड आणि स्टिकर्स असतात. जे चोरी व बनावट प्लेट टाळण्यासाठी उपयुक्त ठरतात.

एचएसआरपी नंबर प्लेट लावणं बंधनकारक आहे का?

२०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांसाठी एचएसआरपी नंबर प्लेट लावणं बंधनकारक आहे.

ऑनलाईन अर्ज कसा करावा?


transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन "Apply High Security Registration Plate Online" या पर्यायावर क्लिक करावे. त्यानंतर प्रोसेस पूर्ण करा

HSRP नंबर प्लेट बसवण्याची अंतिम मुदत काय आहे?

एचएसआरपी नंबर प्लेट लावण्यासाठी अंतिम मुदत १५ ऑगस्ट २०२५ आहे.

शुल्क किती आहे?

दुचाकी – ₹450, तीनचाकी – ₹500, चारचाकी व मोठी वाहने – ₹745

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibag Fishing Boat Capsizes: समुद्रात मच्छीमार बोट बुडाली; 5 खलाशांनी 9 तास पोहून गाठला किनारा, 3 जण बेपत्ता

Amravati Accident: चिखलदरा पर्यटन स्थळावर मोठा अपघात; ६०० फूट खोल दरीत कोसळली कार

Mahayuti Phone Taping: महायुतीच्या मंत्र्यांचेच फोन टॅप? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

UPI Payment: फुकट UPI व्यवहार बंद होणार? प्रत्येक व्यवहारावर पैसे मोजावे लागणार?

PM Kisan: कधी मिळणार PM किसानचा हप्ता? 20 व्या हप्त्याची प्रतिक्षा कायम, कोणाला नाही मिळणार पैसा?

SCROLL FOR NEXT