HSRP Number Plate Saam Tv
बिझनेस

HSRP Deadline: महत्त्वाची बातमी! HSRP नंबर प्लेट बसवण्याची मुदत वाढली, शेवटची तारीख काय?

HSRP Registration Deadline Extended: वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्याची मुदतवाढ करण्यात आली आहे.

Siddhi Hande

महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट लावण्यासाठी मुदतवाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने तिसऱ्यांदा मुदतवाढ केली आहे. आता १५ ऑगस्ट २०२५ ही एचएसआरपी नंबर प्लेट लावण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ही नंबर प्लेट बसवून घ्या.

२०१९ पूर्वीच्या सर्व वाहनांना एचएसआरपी (HSRP) नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. २०१९ नंतरच्या सर्व वाहनांना आधीच ही नंबर प्लेट बसवण्यात आली आहे. आतापर्यंत अनेक वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवली आहे.

महाराष्ट्रात तब्बल २ कोटी वाहनांना बसवायची HSRP नंबरप्लेट

महाराष्ट्रात तब्बल दोन कोटी जुनी वाहने आहेत. ज्यांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवायची आहे. यापैकी फक्त २३ लाख वाहनांनाच नंबरप्लेट बसवण्यात आली आहे. अजूनपर्यंत कोट्यवधि वाहनधारकांना ही नंबरप्लेट बसवायची आहे.

एचएसआरपी नंबरप्लेट नक्की आहे तरी काय?

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हे सुरक्षा आणि ओळख वाढवण्यासाठी आहे. भारत सरकारने ही नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. एचएसआरपी नंबरप्लेट हा एक सीरियल नंबर आहे तो नॉन रिमूवेबल लॉक असणार आहे. यामुळे नंबरप्लेट चोरी, वाहन ट्रॅकिंग आणि अन्य सुरक्षा कारणांसाठी महत्त्वाची आहे.

HSRP नंबर प्लेट बसवण्याची प्रोसेस

सर्वात आधी तुम्हाला ऑनलाइन रजिस्ट्रेशन करायचे आहे. त्यासाठी https://bookmyhsrp.com/ या वेबसाइटवर जा.

यानंतर तुमचे वाहन (टू व्हिलर-फोर व्हिलर) आणि राज्याचे नाव टाका.

यानंतर वाहनाची सर्व माहिती भरा. ही माहिती रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटमध्ये असते.

यानंतर तुमचा पत्ता टाका. तुम्हाला जिथे नंबरप्लेटची डिलिव्हरी हवी आहे त्याची माहिती लिहा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yogesh Kadam : आधी पुण्यातील गुन्हेगारीचा आलेख वाचला; नंतर गृहराज्यमंत्र्यांनी गुन्हे रोखण्याचा सरकारचा 'राणबाण उपाय'च सांगितला

Akola Shocking : दिवसभर ५ वर्षांचा चिमुकला बेपत्ता, नंतर सांडपाण्याकडे लक्ष गेलं; दृश्य पाहून कुटुंब हादरलं

Raj Thackeray : महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री हिंदीसाठी का भांडतोय? राज ठाकरेंचा थेट सवाल

Raj Thackeray : 'मुंबईतल्या समुद्रात डुबे डुबे के मारेंगे'; राज ठाकरेंची भाजप खासदार निशिकांत दुबेंना वार्निंग

Ganapati Special Trains : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, गणेशोत्सवानिमित्ताने मध्य रेल्वे चालवणार २५० विशेष गाड्या

SCROLL FOR NEXT