HSRP Number Plate Saam Tv
बिझनेस

HSRP नंबरप्लेट न बसवल्यास होणार दंड; परिवहन विभागाची कारवाई

HSRP Number Plate Penalty: एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास आता वाहनधारकांवर कारवाई होणार आहे. आचारसंहिता संपल्यानंतर ज्या वाहनधारकांनी नंबरप्लेट बसवली नाही त्यांना दंड भरावा लागणार आहे.

Siddhi Hande

सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य

एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास दंड

परिवहन विभागाची कारवाई करण्यास सुरुवात

राज्यातील सर्व वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले होते. दरम्यान, एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यावर वाहनांना दंड भरावा लागणार आहे. आता एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यावर महाराष्ट्र परिवहन विभाग कडक कारवाई करण्याच्या तयारीत आहे.

गोंदिया जिल्ह्यात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बसवली नाही तर वाहनचालकांवर कारवाई केली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यात एकूण १ लाख ८२ हजार वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवायची होती. त्यातील फक्त १ लाख १० हजार वाहनांनाच प्लेट बसवली आहे. अजूनही ७० हजार वाहनधारकांनी या नियमांचे पालन केले नाही.

परिवहन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील जास्त वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नाही. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत होती. त्यानंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. त्यामुळे ज्या वाहनचालकांनी नियम पाळले नाही. त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

राज्यात सध्या आचारसंहिता सुरु आहे.त्यामुळे कोणत्याही प्रकारची तपासणी आणि दंड आकारला नव्हता. मात्र, आचारसंहिता संपल्यानंतर जिल्ह्यात विशेष मोहिम राबवली जाणार आहे. एचएसआरपी नंबरप्लेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, अशा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.

नंबरप्लेट न बसवल्यास भरावा लागणार दंड

एचएसआरपी नंबरप्लेट न बसल्यावर १००० ते १०,००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. तुम्ही जर पहिल्यांदा चूक केली तर १००० रुपये दंड भरावा लागणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहतूकीच्या नियमांचे सर्व पालन करायचे आहे. अन्यथा तुम्हाला चांगलाच फटका बसणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care : या ५ लोकांना चेहऱ्यावर कच्चे दूध लावणे पडेल महागात, वाचा दुष्परिणाम

Kanda- Lasun Chutney: आजीच्या हातची पाट्यावरची कांदा लसणाची चटणी कशी बनवायची?

Bigg Boss Marathi 6 : "मस्तीत नाही शिस्तीत राहायचं..."; अनुश्रीवर संतापला रितेश भाऊ, कठोर शब्दात केली कानउघडणी-VIDEO

NPCIL Recruitment: सरकारी कंपनीत नोकरीची संधी; पगार ५५,९३२ रुपये; अर्ज कसा करावा?

Gajkesari Rajyog 2026: देवतांचा गुरु बृहस्पति बनवणार पॉवरफुल योग; बँक बॅलन्स वाढून करियरमध्येही होणार प्रगती

SCROLL FOR NEXT