Nandurbar : क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबून वाहतूक; अधिकारी हप्ते घेत असल्याचा आरोप, परिवहन विभागाच्या आशीर्वादाने अवैध वाहतूक

Nandurbar News : नंदुरबार प्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने या अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई करावी, तसेच हप्तेखोरीच्या आरोपांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली
Nandurbar News
Nandurbar News Saam tv
Published On

सागर निकवाडे 

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा घाट रस्त्यातून होत असलेली प्रवासी वाहतूक अवैध पद्धतीने केली जात आहे. प्रादेशिक परिवहन विभागाच्या आशीर्वादाने सातपुड्यात ही अवैध्य वाहतूक सुरू असल्याचे बोलले जात आहे. यात नऊ प्रवासी क्षमता असलेल्या चार चाकी वाहनात एक दोन नव्हे तर तब्बल ३१ प्रवासी बसवले जात असल्याचा प्रकार नेहमीच पाहण्यास मिळतो. 

नंदुरबार प्रादेशिक परिवहन विभागाच्या आशीर्वादाने सातपुडा पर्वतरांगेतील घाट रस्त्यावर अवैध प्रवासी वाहतुकीचा गोरखधंदा बिनबोभाट सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचे उदाहरण म्हणजे शनिवारी चांदसैली घाटात झालेल्या भीषण अपघातात आठ निष्पाप भाविकांना जीव गमवावा लागला आहे. तरी देखील आज या मार्गावर क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त प्रवासी घेऊन धोकादायक वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे.

Nandurbar News
Pimpri Chinchwad : मध्यरात्री कारवर बसून हुल्लडबाजी; तरुणांना जमिनीवर बसवून पोलिसांनी दिला चोप

तीनपट क्षमतेने प्रवाशी वाहतूक 
नऊ प्रवासी क्षमता असलेल्या एका चारचाकी बोलेरो वाहनातून चक्क ३१ प्रवाशांना गुराढोराप्रमाणे कोंबून चांदसैलीच्या अवघड घाटातून प्रवास केला जात होता. क्षमतेपेक्षा तिप्पटहून अधिक प्रवासी भरून केलेली ही धोकादायक वाहतूक प्रादेशिक परिवहन विभागाच्या डोळ्यांदेखत सुरू आहे.  यावरून त्यांच्या कार्यक्षमतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Nandurbar News
Beed : दिवाळीत गोरगरिबांना किडे, बुरशीयुक्त तांदूळाचे वाटप; बीड तालुक्यातील संतापजनक प्रकार

अधिकारी हप्ते घेत असल्याची चर्चा 
एका बाजूला अपघातामुळे संपूर्ण सातपुड्यात हळहळ व्यक्त होत असताना दुसऱ्या बाजूला मात्र अधिकाऱ्यांचे हात ओले होत असल्याची गंभीर माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अवैद्य प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांकडून प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी नियमितपणे हप्ते घेत असल्याची चर्चा आहे. या हप्तेखोरीमुळेच जीवघेणी अवैध वाहतूक बेधडकपणे सुरू आहे आणि निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे, असा संतप्त आरोप नागरिक करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com