Pimpri Chinchwad : मध्यरात्री कारवर बसून हुल्लडबाजी; तरुणांना जमिनीवर बसवून पोलिसांनी दिला चोप

Pimpri Chinchwad News : नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद करून सांगवी पोलिसांना या प्रकरणाची तात्काळ माहिती दिली. अवघ्या काही मिनिटात दाखल झालेल्या सांगवी पोलिसांनी हुल्लडबाज तरुणांना पोलीस खाक्या दाखवला
Pimpri Chinchwad News
Pimpri Chinchwad NewsSaam tv
Published On

पिंपरी चिंचवड : मध्यरात्रीच्या सुमारास भर रस्त्यात कारचे सर्व दरवाजे उघडे केले. यानंतर कारच्या छतावर बसून व मोठ्या आवाजात गाणे वाचवत काही तरुण रस्त्यात राडा घालत होते. या हुल्लडबाज तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेत खाक्या दाखवला आहे. तरुणांना जमिनीवर बसवून पोलिसांनी चांगलाच चोप दिला आहे. 

पिंपरी चिंचवड शहरात तरुणांनी हा हुल्लडबाजी केल्याचा प्रकार घडला आहे. मध्यरात्री भर रस्त्यात कारचे सर्व दरवाजे उघडे ठेवून तसेच कारच्या छतावर बसून तसेच मोठमोठ्याने कार मधील लाऊड स्पीकर वाजवून काही हुल्लडबाज तरुणांनी पिंपळे निलख परिसरातील न्यू डी पी रोडवर धिंगाणा घातला होता. यामुळे परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला होता. काही नागरिकांनी पोलिसात तक्रार दिली होती. 

Pimpri Chinchwad News
Pune : कवडीमोल भावामुळे शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकली फुलं; फुले उचलण्यासाठी नागरिकांची झुंबड!

तक्रार प्राप्त होताच पोलीस दाखल 

दरम्यान हुल्लडबाज तरुण न्यू डीपी रोडवर धिंगाणा घालत असतानाचा विडियो काही संजग नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद करून सांगवी पोलिसांना या प्रकरणाची तात्काळ माहिती दिली. त्यानंतर त्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटात दाखल झालेल्या सांगवी पोलिसांनी हुल्लडबाज तरुणांना चांगल्याच पोलीस खाक्या दाखवला. यानंतर हुल्लडबाज तरुणांना जमिनीवर बसवून चांगला चोप दिला आहे. 

Pimpri Chinchwad News
Dog Attack : पाळीव जर्मन शेफर्ड श्वानाचा मुलावर हल्ला; घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद

पोलिसांकडून चोप देताना केला व्हिडीओ 

पोलिस हुल्लडबाज तरुणांना जमिनीवर बसवून चोप देत असतानाचा विडियो देखील त्या परिसरातील नागरिकांनी आपला मोबाईल मध्ये कैद केला आहे. तर हुल्लडबाज तरुणांना वेळीच पोलिसांनी धडा शिकवल्याने पिंपळे निलख परिसरातील नागरिक पोलिसांच्या तत्पर कारवाई विषयी समाधान व्यक्त करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com