HSRP Number Plate Saam tv
बिझनेस

HSRP नंबरप्लेट अजूनही बसवली नाही? या तारखेपासून होणार कारवाई, भरावा लागणार दंड

HSRP Number Plate Installation Deadline: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य आहे. तर असं केलं नाही तर दंड भरावा लागणार आहे.

Siddhi Hande

HSRP नंबरप्लेटबाबत महत्त्वाची अपडेट

३० जूनपर्यंत नंबरप्लेट बसवणे अनिवार्य

अन्यथा वाहनधारकांवर होणार कारवाई

राज्यातील सर्व वाहनधारकांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. २०१९ आधीच्या सर्व वाहनांना नंबरप्लेट बसवायची आहे. एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही मुदत पुन्हा एकदा वाढवण्यात आली आहे. आता ३० जूनपर्यंत एचएसआरपी नंबरप्लेट बसवायची आहे.

या तारखेपर्यंत मुदतवाढ (HSRP Number Plate Deadline Extended)

महाराष्ट्रातील लाखो वाहनांनी अजूनपर्यंत एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नाही. फक्त सोलापूरातील १ सव्वा नऊ लाख वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट बसवणे बाकी आहे. आता ३० जूनपर्यंत शेवटची तारीख आहे. मुदतीनंतर मात्र ज्यांच्याकडे एचएसआरपी नंबरप्लेट नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई होणार आहे.

फक्त एकट्या सोलापूर जिल्ह्यातील ७३ टक्के वाहनधारकांनी एचएसआरपी नंबरप्लेट बसवलेली नाही. राज्यातील ५० टक्के वाहनधारकांना अजून एचएसआरपी नंबरप्लेट बसवायची आहे. आता यासाठी मुदत देण्यात आली आहे. मुदतीनंतर नंबरप्लेट बसवल्यास पहिल्या वेळी ५०० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. त्यानंतर दुसऱ्या वेळी १००० रुपयांचा दंड भरावा लागणार आहे.

दुसरीकडे एचएसआरपी नंबरप्लेट न बसवल्यास वाहनधारकांची अनेक कामे रखडणार आहेत. कर्जाचा बोजा दुसऱ्याच्या नावे करणे, वाहनांची पुन्हा नोंदणी, वाहनात बदल, वाहन परवाना नुतणीकरण करता येणार नाही. त्यामुळे वाहनधारकांची अनेक कामे वाढणार आहेत.

HSRP नंबरप्लेट बसवावीच लागणार...

१ एप्रिल २०१९ आधीच्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी नंबरप्लेट बसवावी लागणार आहे. यासाठी ३० जूनपर्यंतची शेवटची मुदत देण्यात आली आहे. नंबरप्लेट न बसवल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. आरटीओकडील कामेदेखील थांबवली जाणार आहे, असं विजय पाटील, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर यांनी सांगितलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Thane fire : ठाणे रेल्वे स्टेशनजवळ अग्नितांडव! अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यासह दोघांचा मृत्यू; २ गंभीर जखमी

Weather Update : ४ दिवस १३ राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळणार, महाराष्ट्रात काय स्थिती? वाचा आजचा हवामान अंदाज

Thane : ठाण्यातील Hidden ऐतिहासिक ठिकाण, धुक्याच्या सरींमध्ये न्हालेला 'हा' किल्ला पाहायला विसरू नका

डोनाल्ड ट्रम्प यांचा सर्वात मोठा दावा! म्हणाले, "नेतान्याहू माझ्या इशाऱ्यावर चालणार, इस्रायलमध्ये माझी ९९% लोकप्रियता"

Riteish - Raja Shivaji Collection : रितेश भाऊंचा बॉक्स ऑफिसवर जलवा; 'राजा शिवाजी'नं 'सैराट'ला पछाडलं, बनवणार 'हा' जबरदस्त रेकॉर्ड, वाचा कलेक्शन

SCROLL FOR NEXT