Car Insurance Saam Tv
बिझनेस

Car Insurance: पावसाच्या पाण्यात वाहून गेली वाहने, इंश्योरेंस होणार का क्लेम?

Sejal Purwar

संपुर्ण राज्यभरात सध्या पावसाने थैमान घातले आहे. अनेक ठिकाणी या मुसळधार पावसात नागरिकांची वाहने वाहून गेल्याचे आपण पाहिले आहे. अशात तुमच्याकडे जर वाहन असेल तर आपली वाहने पावसात वाहून गेली किंवा बुडाली तर त्याचे इंश्योरेंस मिळतो का? कार किंवा मोटारसायकलच्या विम्याचे किती पैसे मिळतात? हे प्रश्न तुम्हाला देखिल पडले असणारच. चला तर मग जाणुन घेऊया यासंदर्भात

देशासह संपूर्ण राज्यात पावसाळा सुरू झाला आहे. अनेक राज्यांमध्ये पाणी साचल्याच्या बातम्या आहेत. शिवाय अनेक दिवसांपासून मोटारसायकल वाहून गेल्याचे किंवा चारचाकी पाण्यात बुडाल्याचे व्हिडिओ(Video) आणि फोटो आपण बघतोय. केवळ पावसामुळेच नाही तर अगदी अंडरग्राउंड पार्किंगमध्येही पाणी शिरले आणि वाहने पाण्याखाली गेली तरी मोठे नुकसान होऊ शकते आणि दुरुस्तीसाठी हजारो रुपयांचा खर्च होऊ शकतो.

पाण्यात कारचे काय नुकसान होते?

जरआपल्या कारमध्ये पाणी शिरले तर काय नुकसान होऊ शकते हे समजून घ्यायला हवे. तज्ज्ञांच्या मते इंजिनमध्ये पाणी शिरल्याने इंजिनमध्ये बिघाड होण्याची शक्यता असते. इलेक्ट्रिक पॅनेल्स आणि इलेक्ट्रॉनिक सिस्टम (System) खराब होऊ शकते. अनेक अंतर्गत भागांना गंज येण्याची देखिल शक्यता असते. शिवाय गिअर बॉक्समध्ये पाणी शिरल्यास, गियर बॉक्स खराब होऊ शकतो. कारचे इंटीरियर, सीट, एसी व्हेंट यांसारख्या गोष्टीही खराब होऊ शकतात. मात्र अनेकदा या सर्व समस्या लगेचच दिसतात असे नाही तर काही वर्षांनंतर देखिल हे त्रास जाणवू शकतात.

कोणत्या इंश्योरेंसने होणार तुम्हाला फायदा?

जर तुमच्याकडे कार इंश्योरेंस असेल तर अनेक समस्यांमध्ये तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो. जसे की नैसर्गिक आपत्ती, अपघात, चोरी इत्यादींसाठी सर्वसमावेशक इंश्योरेंस पॉलिसी अधिक फायदेशीर आहे. यामध्ये,जर खराब हवामानामुळे वाहनाचे झालेले नुकसान बदलण्यासाठी कव्हर मिळते. मात्र हे धोरण ऐच्छिक आहे.

त्यामुळे तुम्ही कार इंश्योरेंस पॉलिसी खरेदी करताना या संदर्भात विचारपूस करणे गरजेचे आहे. जेणेकरून नैसर्गिक आपत्तींमुळे झालेल्या नुकसानीपासून तुम्हाला संरक्षण (Protection)मिळेल. तुम्ही सर्वसमावेशक इंश्योरेंस पॉलिसी घेतली असेल तर कारचे झालेले कोणतेही नुकसान कव्हर केले जातात. यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होतो आणि तुमचा खर्च कमी होतो. हे इंश्योरेंस कव्हर तुमचे खूप पैसे वाचवू शकेल.

थर्ड पार्टी इंश्योरेंसचा लाभ मिळतो का?

थर्ड पार्टी इंश्योरेंस जर तुम्ही घेतला असेल तर इंश्योरेंस कंपनी तुम्हाला मदत करू शकते परंतु यात तुम्ही तुमच्याकडून किंवा नैसर्गिक आपत्तीने वाहनाला झालेल्या नुकसानीसाठी क्लेम करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही सर्वसमावेशक इंश्योरेंस पॉलिसी घ्यायला हवी.

इंश्योरेंस कधी नाकारले जाऊ शकते?

इंश्योरेंस कंपन्या सर्व नुकसानांसाठी संरक्षण पुरवत असल्या तरी काही प्रकरणांमध्ये ते क्लेम नाकारतात देखिल हे लक्षात ठेवावे. जसे की कार मालकाच्या निष्काळजीपणामुळे नुकसान झाले तर. अर्थातच तुमची कार (car )बेसमेंटमध्ये उभी आहे आणि ती पाण्यात बुडाली. यानंतर तुम्ही थेट विमा कंपनीला तक्रार करत आहात. बेसमेंटमधून इंश्योरेंस कंपनीने तुमची कार टो करून सर्व्हिस सेंटर किंवा गॅरेजमध्ये नेली तर क्लेममध्ये कोणतीही अडचण येत नाही. मात्र कार बुडल्यानंतर तुम्ही कार सुरू करण्याचा प्रयत्न केला तर कारचे इंजिन हायड्रोस्टॅटिक लॉकमध्ये जाते. अशा प्रकरणात इंश्योरेंस कंपनी इंजिनच्या बिघाडाला क्लेम करणार नाही. कारण ते तुमच्या निष्काळजीपणामुळे झालेले नुकसान आहे.

गाडी घेताना या बाबी लक्षात ठेवा.

तुम्ही कार खरेदी करत असताना हे लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या कारसाठी फक्त सर्वसमावेशक इंश्योरेंस पॉलिसी(Policy) घ्यायला हवी. ही पॉलिसी घेतल्यानंतर तुमची कार पाण्यात बुडली तरी तुम्ही क्लेम करू शकतात. तुमची गाडी बुडत असेल किंवा पाण्यात तरंग असेल तेव्हा लगेच त्याचा व्हिडिओ बनवा आणि फोटो देखिल काढा. हे तुमच्यासाठी पुरावा म्हणून महत्त्वाचे आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur News: लेझरमुळे तरूणाच्या डोळ्याचा घात, लेझर लाईटमुळे डोळ्यात रक्तस्त्राव; जीवनात अंधार आणणारा उन्माद कधी थांबणार?

CNG Price Hike: ऐन गणेशोत्सवात नागरिकांना फटका; पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये CNG च्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या नवीन दर

Maharashtra Politics: विधानसभेतही सांगली पॅटर्न? रोहित पाटील यांच्याविरोधात विशाल पाटलांची बंडाळी?

Manoj Jarange Patil: हे सरकार मला कधीही मारू शकतं, मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप

Dhanjay Munde: जरांगे-मुंडेंमध्ये मध्यरात्री गुफ्तगू; पंकजा मुंडेंचा पराभव, धनजंय मुंडेंची खबरदारी

SCROLL FOR NEXT