Car Insurance Claim: कारचा अपघात झालाय? असं करा क्लेम लगेच मिळेल अपघात विम्याचा पैसा

Car Insurance : तुम्हालाही तुमच्या वाहनांचा क्लेम करायचा असेल तर क्लेम करण्याआधी काही गोष्टी डोक्यात ठेवणं आवश्यक आहे.
Car Insurance
Car Insurance Saam Tv
Published On

Car Insurance Claim Process:

आपल्या वाहनाचा अपघात झाला तर सर्वात आधी इन्शुरन्स क्लेम करण्याचं काम केलं जातं. वाहनाचा विमा काढणं अनिर्वाय आहे. ज्यामुळे आपण आपल्या वाहनांची दुरुस्ती करतो. जर कोणत्या वाहनाचा अपघात झाला तर ७ ते १० दिवसात आपल्या इशुरन्स क्लेम करण्यासाठी अर्ज केला पाहिजे. जेणेकरून क्लेम लवकर पूर्ण होण्यास फायदा होत असतो. जर तुम्हालाही तुमच्या वाहनांचा क्लेम करायचा असेल तर क्लेम करण्याआधी काही गोष्टी डोक्यात ठेवणं आवश्यक आहे. (Latest News)

ज्यावेळी तुमच्या वाहनाचा अपघात होतो, तेव्हा तुम्ही सर्वप्रथम त्याची माहिती विमा कंपनीला द्यावी. त्यानंतरच वाहन गॅरेज किंवा डीलरकडे नेले पाहिजे. यासोबत तुम्ही तुमची कार गॅरेजमध्ये जमा केल्याचा गॅरेजकडून पुरावा घ्या. त्यानंतर वाहनाच्या दुरुस्तीच्या खर्चाचा अंदाज घेतला पाहिजे आणि त्याची माहिती विमा कंपनीला दिली पाहिजे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपघात झाल्यानंतर वाहन व्यवस्थित करण्यासाठी लागलेला खर्च सर्व आपल्या क्लेम अर्जावर भरावा. जर या विम्यात तुमचाही विमा असेल तर त्याचे मेडिकल बिल देखील तुम्ही विमा कंपनीला दिलं पाहिजे.

तुम्ही क्लेम केलेल्या रकमेचा आणि विमा कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या रकमेत अंतर असते. यामुळे विमा कंपनीमधून तुम्हाला जो फायदा होणार आहे. ते सर्व तुम्हाला मिळाले पाहिजेत. यामुळे तुम्ही नेहमी विमा कंपनीच्या प्रतिनिधीला क्लेम शीटवरील प्रत्येक बाबीबद्दल प्रश्न विचारले पाहिजेत. त्याची नोंदही तुमच्याकडे ठेवा.

या आहेतह इन्शुरन्स पॉलिसी

आपल्या देशात दोन प्रकारच्या कार इन्शुरन्स पॉलिसी आहेत. यात थर्ड पार्टी आणि कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅनचा समावेश होतो. यामुळे तुमच्या वाहनासाठी चांगलं कव्हरेज देणारा विमा निवडावा.

IDV पॉलिसी -

ही पॉलिसी खरेदी करताना निश्चित केलेली कमाल विमा रक्कम असते. वाहनाचे संपूर्ण नुकसान किंवा चोरी झाल्यास मालकाला ती किमत दिली जाते. तुमचे वाहन जसजसे जुने होत असते तुमचे IDV विमा घोषित मूल्य कमी होईल. तसाच वर्षानुवर्षे प्रीमियम कमी होऊ शकतो.

कॉम्प्रेहेन्सिव्ह विमा

थर्ड पार्टी इन्शुरन्ससह स्वतःचे नुकसानची पॉलिसी देखील समाविष्ट केली जाते. यामुळे याला कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन पॉलिसी म्हणतात. या पॉलिसीमुळे इतर व्यक्ती आणि वाहनाच्या नुकसानीबरोबरच, तुमच्या वाहनाचे झालेले नुकसानाचे देखील पैसे दिले जातात.

थर्ड पार्टी इन्शुरन्स -

या पॉलिसीमध्ये झालेल्या कोणत्याही अपघाताचा दावा तुम्हाला मिळत नाही. तर समोरच्या व्यक्तीला मिळतो. समजा तुमची बाईक किंवा कार दुसर्‍या बाईक किंवा कारला धडकली. तर विमा कंपनी अपघातामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई समोरच्या व्यक्तीला देते. थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये तुमची बाईक किंवा कार चोरीला गेली तरी तुम्हाला त्याचा दावा मिळत नाही.

कारण यामध्ये चोरीचे संरक्षण नसते. आपल्यातील बहुतेकजण हा विमा घेत असतात. हा थर्ड पार्टी इन्शुरन्स कमी खर्चात मिळतो पण त्यातून मिळणारे लाभ फारच कमी असतात. तर कॉम्प्रेहेन्सिव्ह इन्शुरन्स हा ८०० ते १२०० रुपयांनी महाग असतो. पण लाभही जास्त असतात.

Car Insurance
Home Loan Tips: घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार देखील करेल मदत; Home Loanसाठी 'या' योजना आहेत उपयोगी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com