आपलं स्वत:चं घर असावं अनेकांचं स्वप्न असतं. घर खरेदी करण्यासाठी आणि बांधण्यासाठी अनेकांकडे पुरेसा पैसा नसतो. यामुळे अनेकजण घराचं स्वप्न पूर्ण करू शकत नाहीत. परंतु तुम्हाला माहितीये तुमचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार देखील मदत करतं. (Latest News )
सरकार विविध योजनांच्या आधारे तुमचे स्वप्न पूर्ण करण्यास मदत करत असते. त्यात सणासुदीच्या हंगामात अनेकजण घर खरेदी करत असतात. त्यामुळे तुम्हाला दसरा-दिवाळीच्या शूभ मुर्हूतावर घर घ्यायचं असेल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. सणासुदीचा काळात रिअल इस्टेट क्षेत्रात अनेक ऑफर्स असतात. तसेच सरकार देखील विविध योजनांच्या आधारे आपल्याला मदत करते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
भारत सरकारकडून कर्जावर सबसिडी देण्यासाठी अनेक योजना राबवत आहे. या योजनांमुळे तुमचे कर्जाचे ओझे कमी करता येईल. विशेष बाब म्हणजे सरकारने परडणाऱ्या घरांसाठी बांधकाम मालमत्तेवरील जीएसटी १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आलाय. तर इतर मालमत्तांसाठी १८ टक्क्यांवर ५ टक्के जीएसटी केलीय.
प्रधानमंत्री आवास योजना
या योजनेतून आर्थिकदृष्ट्या दुर्बल, घटकातील ग्राहक घराचे स्वप्न पूर्ण करू शकतात. सरकार या योजनेच्या आधारे गृहकर्जाच्या व्याजवर अनुदान देत असते. कोणतीही व्यक्ती ज्याचे वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपयांपेक्षा कमी आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात. सरकारकडून अडीच लाख रुपयांपर्यंतचे अनुदान दिले जाते.
या योजनेतून मिळणारा पहिला आणि शेवटचा तिसरा हप्ता हा ५० हजार रुपयांचा असतो. तर दुसरा हप्ता हा १.५० लाख रुपयांचा असतो. याशिवाय कर्जावर आकारले जाणारे व्याजदर देखील कमी असते.
क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजना
हा PMAY योजनेचा एक घटक आहे. या योजनेचा लाभ ३ लाख ते १८ लाख रुपयांचे उत्पन्न असलेल्या कुटंब घेऊ शकतात. योजनेअंतर्गत ३ ते ६ लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी उत्त्पन्न असणारा ग्रृप (LIG), तसेच ६ ते १२ लाख वार्षिक उत्पन्न कमावणारे मध्यम उत्पन्न असलेला घटक (MIG-1) आणि १२ ते १८ लाख वार्षिक उत्पन्न कमावणारे मध्यम उत्पन्न असणारा घटक (MIG-2) या योजनेचा लाभ घेत असतात. योजनेअंतर्गत गृहकर्जावर व्याज सबसिडी दिली जाते.
लहान नागरी घरांसाठी योजना
भारत सरकारकडून छोट्या शहरी घरांसाठी व्याज अनुदान योजना राबवले जाते. या योजनेच्या अंतर्गत अनुदानित कर्ज दिले जाते. या योजनेअंतर्गत ९ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रकमेवर ३ ते ६.५ टक्के सबसिडी देण्यात येते. जर तुम्हाला बँकेतून गृहकर्ज घ्यायचे असेल तर तुमच्याकडे सर्व कागदपत्रे असणं आवश्यक असतात. ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, वाहन चालकाचा परवाना , वयाचा पुरावा, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट, आदी कागदपत्रे असणं आवश्यक आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.