SIR Online Form google
बिझनेस

SIR Online Form : 17 ऑगस्ट शेवटची तारीख! SIR ऑनलाइन फॉर्म 5 मिनिटांत कसा भराल? स्टेप बाय स्टेप संपूर्ण प्रोसेस

SIR Registration 2026: ECINet अॅपच्या मदतीने तुम्ही घरबसल्या सोप्या पद्धतीने SIR भरू शकता. याची प्रोसेस सोपी आहे. त्यासाठी तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे असणे महत्त्वाचे आहे.

Sakshi Sunil Jadhav

मतदार यादीच्या Special Intensive Revision (SIR) मोहिमेमध्ये ऑनलाइन नोंदणी करण्याची प्रोसेस सुरू आहे. १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत आवश्यक नोंदणी न केल्याने काही प्रकरणांमध्ये मतदार यादीतल्या नोंदीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पात्र नागरिकांनी वेळेत अर्ज भरणं महत्त्वाचं आहे.

ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सर्वातआधी मोबाईलमध्ये ECINet हे भारताच्या निवडणूक आयोगाचे अधिकृत अॅप डाउनलोड करा. अॅपमध्ये Search Your Name in Last SIR या पर्यायातून राज्य, जिल्हा आणि मतदारसंघ निवडून २००२ च्या SIR यादीत स्वत:चे किंवा आई-वडील, आजी- आजोबांचे नाव शोधा. नाव मिळाल्यावर त्याचा स्क्रीनशॉट सेव्ह करून ठेवा.

यानंतर Voter Registration Forms मध्ये जाऊन Special Intensive Revision – Fill Enumeration Form Online हा पर्याय निवडा. नवीन युजर्सनी मोबाईल नंबर किंवा OTP च्या मदतीने नोंदणी करा, तर आधीपासून खातं असेल तर थेट लॉगिन करा.

फॉर्म भरताना महाराष्ट्र राज्य निवडून EPIC (मतदार ओळखपत्र) नंबर टाका. माहिती तपासल्यानंतर योग्य पर्याय निवडणे महत्त्वाचे आहे. २००२ च्या SIR यादीमध्ये स्वत:चे नाव असेल तर पहिला पर्याय, नातेवाईकांचे नाव असेल, दुसरा, सध्याच्या मतदार यादीतल्या घरातले सदस्याचे नाव असल्यास तिसरा, तर इतर सर्वांसाठी चौथा पर्याय निवडावा. यानंतर वैयक्तिक माहिती, नातेवाईकांची माहिती, जन्मतारीख आणि आवश्यक तपशील भरून नवीन पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड करावा.

सर्व माहिती पुन्हा तपासून घोषणा (Declaration) स्वीकारल्यावर आधार ओटीपीच्या मदतीने e-Sign प्रोसेस पूर्ण करा. मग अर्ज सबमिट झाल्यानंतर मिळणारा Reference ID सुरक्षित सेव्ह करून ठेवा. याचा वापर तुम्ही अर्जाची स्थिती तपासण्यासाठी करू शकता.

महत्त्वाची सूचना: नावाची स्पेलिंग जुळत नसल्यास, मोबाईल क्रमांक लिंक नसल्यास किंवा OTP संदर्भात अडचण आल्यास वेळ न दवडता आपल्या BLO (Booth Level Officer)** यांच्याशी संपर्क साधून ऑफलाइन अर्ज सादर करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सीजेपी 'क्या बोलती पब्लिक' मोहीम राबवणार - अभिजीत दिपके

Sanjay Raut: शिंदे गटात अस्वस्थता, भाजपमध्ये विलीनीकरणाचा पर्याय, ठाकरेंच्या खासदाराचं सूचक वक्तव्य

Hair Care : केसांना गरम तेल लावणं योग्य की अयोग्य? या '६' गोष्टी ठेवा लक्षात नाहीतर होईल नुकसान

ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर हिरवे आणि निळे कपडेच का घालतात?

Home Accident: शेल्फ फुटला अन् काचेचा तुकडा पायात घुसला, चालण्याची शक्यताच संपली होती, पण...! डॉक्टरांनी वाचवला तरूणाचा पाय

SCROLL FOR NEXT