SIR Update : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! SIR प्रक्रियेसाठी मुदतवाढ; नागरिकांना दिलासा

SIR Voter List Update News : निवडणूक आयोगाने SIR प्रक्रियेला १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत मुदतवाढ दिली आहे. मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती, पत्ता बदल आणि हरकतींसाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्ध होणार आहे.
ELECTION COMMISSION EXTENDS SIR VOTER LIST VERIFICATION DEADLINE TO AUGUST 17, 2026
ELECTION COMMISSION EXTENDS SIR VOTER LIST VERIFICATION DEADLINE TO AUGUST 17, 2026 Saam Tv
Published On
Summary
  • SIR प्रक्रियेची मुदत १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढवली

  • २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार

  • २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबरदरम्यान हरकती व दावे स्वीकारले जातील

  • सर्व अर्जांची छाननी व सुनावणी २२ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करून अंतिम मतदार यादी २७ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रकाशित केली जाईल

राज्यात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेला निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली असून, यामुळे अद्याप मतदार यादीत नाव नोंदवता न आलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार, बूथ लेव्हल अधिकारी (BLO) यांची घराघरांत जाऊन पडताळणी करण्याची मोहीम आता १७ ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे नवीन मतदार नोंदणी तसेच मतदार यादीतील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी नागरिकांना अतिरिक्त वेळ मिळणार आहे.

निवडणूक आयोगाने पूर्वी जाहीर केलेल्या नियोजनात बदल करत नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार १७ ऑगस्ट रोजी मतदान केंद्रांचे पुनर्गठन करण्यात येईल. त्यानंतर २४ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. या यादीवर हरकती किंवा दावे सादर करण्यासाठी नागरिकांना २४ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर हा कालावधी उपलब्ध असेल.

ELECTION COMMISSION EXTENDS SIR VOTER LIST VERIFICATION DEADLINE TO AUGUST 17, 2026
Curry Leaves Benefits : केसगळती ते डायबेटिस...रोज कढीपत्ता खाल्ल्यानं होतील ६ जबरदस्त फायदे, वाचा

या कालावधीत प्राप्त होणाऱ्या सर्व अर्जांची छाननी, सुनावणी आणि त्यावरील निर्णय २२ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर आवश्यक दुरुस्त्या करून २७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित केली जाईल. दरम्यान, ज्यांचे नाव अद्याप मतदार यादीत समाविष्ट झालेले नाही किंवा नाव, पत्ता, जन्मतारीख अथवा इतर तपशीलांमध्ये बदल करायचा आहे, त्यांनी या मुदतवाढीचा लाभ घेत वेळेत अर्ज करण्याचे आवाहन आयोगाने केले आहे.

ELECTION COMMISSION EXTENDS SIR VOTER LIST VERIFICATION DEADLINE TO AUGUST 17, 2026
Egg Benefits : पिवळा की पांढरा? अंडे खाताना कोणता भाग खाणं शरीरासाठी फायदेशीर ठरेल

तसेच मतदार नोंदणी, दुरुस्ती किंवा नाव वगळण्यासाठी अर्ज करताना चुकीची माहिती देणे किंवा खोटी घोषणा करणे हा कायद्याने गुन्हा असल्याचा इशाराही आयोगाने दिला आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह अचूक माहिती सादर करून आपले मतदानाचे अधिकार सुरक्षित ठेवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com