ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा प्रश्न पडतो की, आयकर (Income Tax) कसा वाचवायचा? आएफडीमध्ये गुंतवणूक करून त्यांना कर वाचवता येतो. इतर पर्यायांच्या तुलनेत एफडीमधील गुंतवणूक सर्वात सुरक्षित मानली जाते. आपण याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या. (marathi news)
आयकर रिटर्न भरण्याची वेळ जसजशी जवळ येते, तसे लोक कर बचतीचे पर्याय शोधू (Senior Citizens Schemes) लागतात. गुंतवणूक कुठे करावी, कुठे त्यांचे करबचतीसोबतच पैसेही सुरक्षित असतील, याची चिंता ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक असते. यासाठी विशेष मुदत ठेव (FD) योजना फायदेशीर आहे. एफडीमध्ये गुतवणूक केल्याने तुमची गुंतवणूक सुरक्षित राहते आणि करही वाचतो.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
कर-बचत एफडी म्हणजे काय
कोणत्याही बँकेच्या FD मधील गुंतवणूक इतर सर्व गुंतवणूक पर्यायांपेक्षा सुरक्षित मानली जाते. हे ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील फायदेशीर आहे, कारण भारतात त्यांना FD वर सामान्य नागरिकांपेक्षा 0.50 टक्के जास्त व्याज मिळते. यामध्ये टॅक्स सेव्हिंग एफडीचाही पर्याय (Investement In Fixed Deposit) आहे.
टॅक्स सेव्हिंग एफडी सामान्य एफडीप्रमाणे असतात, परंतु त्यांचा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा असतो. ही एक प्रकारची संचयी एफडी आहे. ज्यामध्ये तुम्हाला 5 वर्षानंतर मॅच्युरिटीवर व्याज दिले जाते. या प्रकारच्या FD मध्ये, तुम्हाला दरवर्षी मिळणारे व्याज तुमच्या FD च्या मूळ रकमेत जोडले जाते.
एफडीवर कर सूट उपलब्ध
टॅक्स सेव्हिंग एफडीमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते. कलम 80C अंतर्गत, तुम्ही एका वर्षात जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची कर सूट घेऊ शकता. यामध्ये तुमच्या विम्यापासून पोस्ट ऑफिसपर्यंत केलेल्या गुंतवणुकीचा समावेश होतो.
जर तुमच्या FD ला व्याजातून दरवर्षी उत्पन्न मिळत असेल, तर त्यांना मिळालेल्या व्याजावर कर भरावा (Investement) लागेल. ज्येष्ठ नागरिक म्हणजेच जे 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे आहेत, ते देखील त्यांच्या FD व्याज उत्पन्नावर सूट घेऊ शकतात. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80TTB अंतर्गत, ते रु. 50,000 पर्यंतच्या विविध गुंतवणुकीवरील एकूण व्याज उत्पन्नासाठी कर सूट मागू शकतात. यामध्ये पोस्ट ऑफिस आणि एफडीच्या उत्पन्नाचाही समावेश आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.