EPFO News Saam Tv
बिझनेस

EPFO News: EPFO च्या PF खात्यावर मिळतो 7 लाख रुपयांचा विमा कव्हर; जाणून घ्या कसा फायदा मिळतो?

EPFO Latest Update: EPFO च्या EDLI योजनेतून PF सदस्यांना कोणत्याही प्रीमियमशिवाय ७ लाख रुपयांपर्यंत मोफत जीवन-विमा कव्हर मिळते. नोकरीदरम्यान मृत्यू झाल्यास कुटुंबाला मोठा आर्थिक आधार मिळतो.

Sakshi Sunil Jadhav

देशातील बहुतेक कर्मचाऱ्यांकडे पीएफ म्हणजेच भविष्य निर्वाह निधी खाते असते. सर्वसामान्यपणे लोक पीएफला फक्त निवृत्तीनंतर मिळणारी रक्कम किंवा पेन्शनशी जोडून पाहतात. पण या खात्याचा आणखी एक मोठा आणि अनेकांना माहीत नसलेला फायदा आहे. EPFO आपल्या सर्व सदस्यांना 7 लाख रुपयांपर्यंतचे मोफत जीवन-विमा कव्हर देतं. पुढे आपण याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत.

PF खाते असले की कर्मचारी आपोआप EDLI म्हणजे ‘Employee Deposit Linked Insurance’ या स्कीमअंतर्गत कव्हर होतो. ही EPFO कडून दिली जाणारी एक विशेष जीवन विमा योजना आहे आणि EPF व EPS नंतर मिळणारा तिसरा मोठा लाभ मानला जातो. या योजनेअंतर्गत कर्मचारी काम करत असलेल्या कंपनीकडून दर महिन्याला बेसिक पगार व DA च्या 0.5% इतकी रक्कम विमा प्रीमियम म्हणून जमा केली जाते. हा संपूर्ण खर्च कंपनीकडून केला जातो. त्यामुळे कर्मचाऱ्याच्या पगारातून एकही रुपया कट होत नाही. त्यामुळे EDLI योजना नोकरदारांसाठी अतिशय फायदेशीर ठरते.

ही विमा योजना तेव्हाच लागू होते जेव्हा कर्मचारी नोकरीदरम्यान निधन पावतो. अपघात ऑफिसमध्ये झाला असो, घरी किंवा सुट्टीवर कोणतीही परिस्थिती असो, ही स्कीम पूर्णपणे लागू राहत असून कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळते.

EDLI अंतर्गत मिळणारी विमा रक्कम दोन भागात ठरवली जाते. किमान 2.5 लाख रुपयांचे कव्हर दिले जाते, तर जास्तीत जास्त मर्यादा 7 लाख रुपये आहे. ही रक्कम ठरवताना कर्मचाऱ्यांच्या गेल्या 12 महिन्यांच्या सरासरी पगाराचा आणि पीएफमधील जमा रकमांचा आधार घेतला जातो. ही सुविधा सर्व त्या कर्मचाऱ्यांना मिळते ज्यांचे PF कपात होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill Hospitalised: भारताचा कर्णधार शुभमन गिल हॉस्पिटलमध्ये दाखल, नेमकं काय झालंय? महत्वाची अपडेट

Maharashtra Politics : धनंजय मुंडे स्टार प्रचारक, राष्ट्रवादीत वाद; सोळंकेंची मुंडेंविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

Marathi–Hindi Language :पुन्हा मराठी-अमराठीचा वाद, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ व्हायरल

Indurikar Maharaj : या औलादी माझ्या मुळावर उठणार, इंदुरीकर महाराजांचे चॅलेंज; म्हणाले, मुलीचे लग्न....

Shocking : निष्ठूर शिक्षिका, अघोरी शिक्षा; 100 उठाबशा बेतल्या चिमुकलीच्या जीवावर, VIDEO

SCROLL FOR NEXT