Sakshi Sunil Jadhav
हेल्दी आणि न्यूट्रिशस म्हणून ओळखली जाणारी ज्वारीची भाकरी अनेकांच्या दैनंदिन आहाराचा भाग आहे. फायबर, प्रोटीन आणि मिनरल्सयुक्त ज्वारी पचन सुधारते, वजन कमी करण्यात मदत करते आणि डायबेटीजच्या रुग्णांसाठी योग्य मानली जाते.
ज्वारीचे अनेक फायदे असूनही काही व्यक्तींनी ही भाकरी मर्यादित खाणे किंवा पूर्णपणे टाळणेच योग्य ठरते. चला जाणून घेऊया कोणी ज्वारीची भाकरी टाळली पाहिजे आणि त्यामागची कारणे काय आहेत.
ज्वारीतील फायबर जास्त असल्यामुळे पचनसंस्था कमजोर असेल तर गॅस, पोटफुगी आणि पोटदुखीची समस्या वाढू शकते.
IBS (Irritable Bowel Syndrome) रुग्णांचे पोट फायबर-sensitive असते. त्यामुळे ज्वारीतले हाय फायबर त्यांचे क्रॅम्प्स आणि डायरिया वाढवू शकते.
ज्वारीतील कार्बोहायड्रेट्स काही लोकांमध्ये जलद fermentation करतात. त्यामुळे गॅसची समस्या वाढू शकते.
ज्वारीत goitrogenic compounds असतात. जे थायरॉईडची कार्यक्षमता कमी करू शकतात. त्यामुळे अशा लोकांनी जास्त भाकरी टाळावी.
लहान मुलांची पचनशक्ती कमी असल्याने ज्वारी जड पडू शकते आणि पोटफुगी व बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकता.
ज्वारी जड असल्याने तृप्ती जास्त मिळते, त्यामुळे कमी खाल्ले जाते. वजन वाढवायचे असेल तर हा आहार अडथळा ठरू शकतो.
जड व फायबरयुक्त आहार अॅसिडिटी वाढवू शकतो. त्यामुळे ज्वारीची भाकरी रात्रीच्या जेवणात टाळावी.
ज्वारीत पोटॅशियम प्रमाण जास्त असते; त्यामुळे किडनी रुग्णांनी ते नियंत्रणात ठेवणे आवश्यक असते. ज्वारीतील complex carbs पचायला वेळ घेतात, त्यामुळे अचानक ऊर्जा कमी होण्याची समस्या असणाऱ्यांना त्रास होऊ शकतो.