ITR Refund Form: हल्ली सगळ्याच कंपन्यांनी त्यांच्या कंपन्यांकडून ITR फॉर्म भरुन घेतले आहेत. ITR फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 31 जुलै 2023 आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक आयकर रिटर्न भरत आहेत परंतु, त्याचा परतावा कधी मिळणार हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे.
जर तुम्ही देखील आयकर रिटर्नचा फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला ही प्रश्न पडला असेल की, परतावा कसा मिळतो किंवा किती मिळतो. तर याची संपूर्ण प्रक्रिया जाणून घेणे आवश्यक आहे.
1. आयटीआर रिफंड सिस्टम कशी काम करते?
जेव्हा आपण आयकर रिटर्न फॉर्म (Income Tax Return) जमा करतो तेव्हा आपला टीडीएस कापला जातो. त्याला प्राप्तिकर परतावा दिला जातो. ITR सबमिट केल्यावर तो परताव्यावर दावा करु शकतो. त्यानंतर करदात्याच्या खात्यात परतावा जमा होतो.
2. परतावा कसा मिळतो ?
तुमचा आयटीआर फॉर्म भरताना सर्व अटी आणि नियमांचे पालन केले तर परतावा लवकर मिळू शकतो.
जे लोक ऑनलाइन (Online) आयटीआर फाइल करतात त्यांना त्वरीत परतावा मिळतो.
आयटीआर पडताळणी ऑनलाइन आधार ओटीपीद्वारे ई-स्वाक्षरी केल्यानंतर आयकर रिटर्न तुमच्या बँक (Bank) खात्यात पटकन जमा होतो.
जर आयटीआर मुदतीपूर्वी भरल्यास त्याचा लवकर परतावा मिळतो.
3. इन्कम टॅक्स रिफंड मिळण्यासाठी किती वेळ लागतो?
जर तुम्ही तुमचा आयटीआर योग्यरित्या भरला असेल , तर साधारणपणे तुम्हाला सहा महिन्यांसाठी आयटीआर परतावा मिळतो. अलिकडच्या वर्षांत आयकर परताव्याची प्रक्रिया अधिक जलद झाली आहे त्यामुळे काही आठवड्यातच तुम्हाला परतावा मिळू शकतो. आयकर विभागाकडून परतावा जारी केल्यावर एक मेल पाठवला जातो. तुम्ही इन्कम टॅक्सच्या वेबसाइटवरही त्याची स्थिती पाहू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.