Maharashtra Live News Update: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात, विदर्भात थंडी कायम

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates: आज मंगळवार, दिनांक १८ नोव्हेंबर २०२५, आजच्या ताज्या बातम्या, महाराष्ट्र हवामान अपडेट्स, राज्यात थंडीची लाट, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका अपडेट्स, राज्यातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra Live News Update
Maharashtra Live News UpdateSaam tv

सिंधुदुर्गात भाजपाकडून चारही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर

जिल्ह्यात भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार..

जिल्ह्यात महायुती होण्याची चिन्हे संपुष्टात आल्याचे स्पष्ट संकेत

भाजपाने आता जिल्ह्यात एकला चलो रे ची भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जिल्ह्यातील चारही नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठी उमेदवारांची यादी केली जाहीर.

बुलढाण्यात पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांचा पाऊस.

ओबीसी आरक्षण असू देत किंवा इतर कारणांमुळे रखडत गेलेल्या पालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुलढाण्यातील अकरा नगर परिषदांच्या निवडणुकीत अक्षरशः उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. नगराध्यक्ष पदाच्या 11 जागांसाठी 212 तर नगरपरिषद सदस्यांच्या 286 जागांसाठी 2541 अर्ज दाखल झाले आहेत. म्हणजे सरासरी एका सदस्यासाठी नऊ जणांनी अर्ज दाखल केले आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेसाठी सर्वात जास्त 359 अर्ज दाखल झाले आहेत, तर जळगाव जामोद नगर परिषदेसाठी सर्वात कमी 167 अर्ज दाखल झाले आहेत. आता पुढील चार दिवस उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर 21 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील उमेदवारांचा चित्र स्पष्ट होणार आहे.

nashik-manmad-नाशिक जिल्ह्यात तापमानाचा पारा घसरला

नाशिक जिल्ह्यात रोज तापमानाचा घसरत असल्याने जिल्ह्यात थंडीने चांगलीच हुडहुडी भरला आहे.नाशिकच्या निफाड मध्ये पारा 6.9 अंश तर मालेगाव मध्ये पारा १० अंशावर गेला आहे.त्यामुळे थंडी पासून बचावा साठी शेकोट्यांचा आधार घेत असल्याच पहावयास मिळत आहे

पुणे–सिंगापूर विमानसेवा चार महिन्यांपासून बंद

अहमदाबाद विमान अपघातानंतर तांत्रिक तपासणीच्या कारणाने बंद केलेली पुणे–सिंगापूर विमानसेवा गेल्या चार महिन्यांपासून सुरू झालेली नाही

एअर इंडियाच्या ताफ्यातील तांत्रिक अडचणींमुळे डीजीसीएने तपासणीचे आदेश दिल्यानंतर ही सेवा थांबवण्यात आली होती

प्रवासी मागणी भरपूर असूनही विमान कंपनीकडून सेवा पूर्ववत करण्यात आलेली नाही

परिणामी पुणेकरांना मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, हैदराबाद इथून सिंगापूरला जावे लागत आहे. वाढीव वेळ, वाढलेला खर्च आणि कनेक्टिंग फ्लाइट्सच्या गैरसोयीमुळे नाराजी व्यक्त होत आहे

पुणे विमानतळावरून सिंगापूर विमान सेवा लवकर सुरू करण्याची मागणी प्रवासी आणि उद्योजकांकडून होत आहे

अंथरूणातून बाहेर पडा आणि सारसबागेत या! गुलाबी थंडीत पुणेकरांची व्यायामाला पसंती

सध्या पुण्यात गुलाबी थंडी पसरलीय आणि या थंडीचा नागरिक आनंद घेताना दिसतात. सकाळच्‍या सत्रामध्ये पारा अधिक खाली येत असल्याने या गुलाबी थंडीत पुणेकर मोठ्या प्रमाणात व्यायामाला पसंती देत असल्याचे दिसून येतंय. थंडीच्या काळात व्यायाम करणे म्हणजे उत्तम आरोग्यासाठी लाभदायक असते. याच निमित्ताने पुण्यातील सारसबागेत उत्कर्ष ग्रुपकडून दररोज पहाटे पासून याठिकाणी व्यायामशाळा भरवली जाते. विशेष म्हणजे तरुणांपासून ज्येष्ठ नागरिकांचा या ठिकाणी सहभाग असतो तेही निःशुल्क. मागील आठवड्यापासून कडाक्याच्या थंडीने गारठू लागले आहेत. शहरावर सकाळी हलक्या धुक्याचे साम्राज्य पसरत आहे असं असलं तरीसुद्धा सारसबागेतील ही गँग मात्र व्यायामात घामाघूम होते.

यवतमाळात ऐनवेळी आघाडीत बिघाडी

भाजप यवतमाळ जिल्ह्यातील 10 नगरपरिषद आणि एक नगरपंचायतीमध्ये स्वबळावर लढत असून यवतमाळ पालिकेत ऐनवेळी आघाडीत बिघाडी झाल्याने काॅग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटांनी स्वत्रंत उमेदवार एकमेकांविरुद्ध उभे केले आहे.तर भाजपने प्रस्थापितांच्या उमेदवारीला कात्री लावली आहे. 29 पैकी 14 जणांची उमेदवारी कापण्यात आली तिथे नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली शेवटच्या क्षणी काहींना उमेदवारी आणण्यात यश मिळाले.यवतमाळ पालिकेत चौरंगी लढत होणार आहे.

वंचितच्या उच्च शिक्षित उमेदवाराने दाखल केला उमेदवारी अर्ज

बुलढाणा नगरपरिषद निवडणुकीसाठी दोन दिवसापूर्वीच काँग्रेस आणि वंचित ने पत्रकार परिषद घेत युती जाहीर केली होती. मात्र काल बुलढाणा नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार सौ. लक्ष्मीबाई काकस यांनी काँग्रेस कडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर वंचितनेही उच्चशिक्षित असलेल्या डॉ. संगीता अर्जित हिरवळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यामुळे मात्र आता काँग्रेस उमेदवारापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. वंचित चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानेच हा अर्ज दाखल केल्याच वंचितच्या डॉ. संगीता हिरोळे यांनी म्हटले आहे. डॉक्टर संगीता हिरोळे या उच्चशिक्षित असून बुलढाण्यातील समाजसेवा क्षेत्रातील मोठे नाव असलेले अमोल हिरोळे यांच्या सुनबाई आहेत. यात मात्र डॉक्टर संगीता हिरोळे यांच पारडं जड असल्याने काँग्रेस पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. वंचितच्या उमेदवार डॉ.संगीता हिरोळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संजय जाधव यांनी....

जालन्यात भाजप नगरपालिका निवडणुकीत स्वबळावर

जालन्यात नगरपालिका निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा देत अंबड, परतूर आणि भोकरदन नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. भोकरदन नगरपरिषदेत सर्वच पक्षाने स्वबळावर लढण्याची तयारी करत अर्ज दाखल केले आहे. तर परतुरला प्रमुख प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप यांनी नगराध्यक्ष पदासह सर्वच जागांवर अर्ज दाखल केले आहे तर दुसरीकडे अंबड नगरपरिषदेत परिषदेत भाजपने रासपला सोबत घेऊन उमेदवारी जाहीर केली असून आघाडी बाबत सध्यातरी निर्णय झालेला नाही. शुक्रवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे त्यानंतरच युती आणि आघाडीचे चित्र जिल्ह्यामध्ये स्पष्ट होणार आहे.युती आणि आघाडीचा निर्णय स्थानिक नेत्यांवर सोपविण्यात आला आहे.राज्यात बदललेल्या समीकरणाचा परिणाम स्थानिक पातळीवरील दिसत असल्याने युती आणि आघाडीतअडचण दिसत आहे.त्यामुळे सर्वच पक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याच पाहायला मिळते

'अकोला जिल्ह्यातील तेल्हारा नगरपालिकेत वंचितने दिली ईश्वरचिठ्ठीद्वारे उमेदवारी. ईश्वरचिठ्ठी काढतानाचा VIDEO समोर

ईश्वरचिठ्ठीने अनेकवेळा अनेकांची लॉटरी लागल्याचं आपण पाहिलंय. मात्र, ईश्वरचिठ्ठी हे बरेचदा मतदान झाल्यानंतर समान मतं मिळाल्यावर काढली जातेय. मात्र, वंचित बहूजन आघाडीने अकोला जिल्हातील तेल्हारा नगरपालिकेत एक वेगळीच शक्कल लढवलीय. तेल्हारा नगरपालिकेसाठी वार्ड क्रमांक '8 अ' या अनुसुचित जाती महिलेसाठी राखीव प्रभागात चार जण दावेदार होतेय. चौघीनीही उमेदवारीसाठी मोठी लॉबिंग केली होतीय. पक्ष कुणाला उमेदवारी द्यावी, या संभ्रमात असल्याने नेत्यांनी एक भन्नाट आयडिया काढलीय. पक्षाने चारही उमेदवारांच्या नावांच्या चिठ्ठ्या एका बरणीत टाकल्यात. त्यातून एक चिठ्ठी काढण्यात आलीय. शेवटी यात कल्पना हिवराळे यांचं नशीब फळफळलंय. त्यांचं नाव ईश्वरचिठ्ठीत निघाल्याने पक्षाची अधिकृत उमेदवारी हिवराळे यांना देत पक्षाचा 'एबी फॉर्म' देण्यात आलाय. याचा video समोर आलाय.. दरम्यान, ईश्वरचिठ्ठीचा निर्णय दोघांनी मान्य केलाय. तर एका इच्छूकाने मात्र, ऐनवेळी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केलीय. वंचितने तेल्हारा नगरपालिकेत केलेल्या या राजकीय प्रयोगाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा होतीये.

Maharashtra Live News Update: पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात, विदर्भात थंडी कायम

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सध्या थंडी जाणवत असून काही ठिकाणी पारा दहा अंशांच्याही खाली

तापमानात मोठी घट होत असल्यामुळे शीतलहरीचा इशारा हवामान विभागाने वर्तवला आहे

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात काही भागात थंडीच्या लाटेचा इशारा तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा गारठणार

राज्यात सर्वाधिक किमान तापमान अहिल्यानगर मध्ये

अहिल्यानगर मध्ये ९.५ अंश डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद

राज्यातील कुठल्या जिल्ह्यात किती तापमान (किमान तापमान)

अहिल्यानगर: ९.५

नाशिक: ९.६

यवतमाळ: ९.६

जळगाव: ९.८

मालेगाव: १०

गोंदिया: १०

पुणे: १०.२

बीड: १०.२

वाशीम: १०.४

नागपूर: १०.५

अमरावती: १०.५

महाबळेश्वर: ११

सातारा: ११.९

सांगली: १३.७

सोलापूर: १४.९

पुणे शहराच्या बहुतांश भागाचा पाणी पुरवठा गुरूवारी बंद

खडकवासला धरण ते पर्वती जलशुद्धीकरण केंद्र दरम्यान जलवाहिनी जोडणे, जलवाहिनीवर मीटर बसविणे या कारणासाठी गुरुवारी बहुतांश संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा बंद

शुक्रवारी उशिरा कमी दाबाने पाणी पुरवठा सुरू होईल, पाणी पुरवठा विभागाची माहिती

पाणी पुरवठा बंद असलेला भाग पुढील प्रमाणे

पर्वती एमएलआर टाकी, पर्वती एचएलआर टाकी, पर्वती एलएलआर टाकी परिसर, वडगाव शुद्धीकरण केंद्र, राजीव गांधी पंपिंग स्टेशन, लष्कर जलकेंद्र, चिखली जलकेंद्र, वारजे जलकेंद्र, चांदणी चौक टाकी, गांधी भवन टाकी, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी, एसएनडीसी एलएलआर टाकी, एसएनडीटी एमएलआर टाकी, चतुःश्रृंगी टाकी, होळकर जलकेंद्र टाकी, खडकवासला जॅकेवेल, वारजे फेज क्रमांक एक व दोन, गणपती माथा, जुने वारजे जलकेंद्र, नव्याने समाविष्ट गावातील गावांचे बूस्टर केंद्र.

पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परीक्षा

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या १६९ जागांसाठी एक डिसेंबर रोजी राज्यभरातील २० शहरात ऑनलाइन परीक्षा

या परीक्षेसाठी ४२ हजार उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत

पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंत्यांची कमतरता असल्याने बांधकाम, पथ, मलनिःसारण, पाणी पुरवठा, प्रकल्प आदी विभागातील कामांचा खोळंबा

त्यामुळे कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीला प्राधान्य दिले जात आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com