Honor Porsche Design Magic 6 RSR, Magic 6 Ultimate Saam Tv
बिझनेस

Porsche कार डिझाइन असलेला स्मार्टफोन लॉन्च, जबरदस्त फीचर्ससह इतकी आहे किंमत

Honor Porsche Design Magic 6 RSR: चीनी स्मार्टफोन कंपनी Honor ने दोन प्रीमियम स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे फोन Porsche कारच्या डिझाइनसह येतात.

साम टिव्ही ब्युरो

Honor Porsche Design Magic 6 RSR, Magic 6 Ultimate:

चीनी स्मार्टफोन कंपनी Honor ने दोन प्रीमियम स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. हे फोन Porsche कारच्या डिझाइनसह येतात. कंपनीने Porsche Design Magic 6 RSR आणि Magic 6 Ultimate हे दोन फोन सर्वात पॉवरफुल Qualcomm Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसरसह सादर केले आहेत.

यात 66W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह 5,600mAh बॅटरी देण्यात आली आहे. कंपनीने लक्झरी कार निर्माता Porsche च्या सहकार्याने नवीन फोन सादर केले आहेत.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नवीन Honor Porsche Design Magic 6 RSR मध्ये मागील पॅनलवर षटकोनी आकाराचा कॅमेरा देण्यात आला आहे. जो या स्मार्टफोनला लक्झरी फील देतो. दुसरीकडे Magic 6 Ultimate मध्ये चौरस आकाराचा कॅमेरा सेटअप आहे. याशिवाय फोन लक्झरी कारच्या कलर एलिमेंट्स देखील फॉलो करतो. फक्त डिझाइनमध्येच नाही तर फीचर्सच्या बाबतीतही हे फोन प्रीमियम आहेत. सध्या हे स्मार्टफोन फक्त चीनमध्ये लॉन्च करण्यात आले आहे.   (Latest Marathi News)

Porsche Design Magic 6 RSR, Magic 6 Ultimate स्पेसिफिकेशन

नवीन स्मार्टफोन्समध्ये Android 14 वर आधारित MagicOS 8.0 आणि 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह 6.8-इंच फुल HD+ LTPO OLED डिस्प्ले आहे. Porsche Design Magic 6 RSR मध्ये 24GB रॅम आणि 1TB स्टोरेजसह Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर आहे. तर Magic 6 Ultimate 16GB रॅमसह 512GB आणि 1TB स्टोरेजसह येतो. दोन्ही स्मार्टफोनमध्ये 3D डेप्थ सेन्सरसह 50MP वाइड-एंगल कॅमेरा देण्यात आला आहे.

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाल्यास, Honor Porsche Design Magic 6 RSR आणि Magic 6 Ultimate मध्ये OIS सपोर्ट आणि 100x डिजिटल झूम असलेला 180-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय कॅमेरा युनिट 50MP वाइड-एंगल सेन्सर आणि 50MP वाइड-एंगल कॅमेरा सेन्सरसह येतो. याची 5600mAh बॅटरी 80W वायर्ड चार्जिंग आणि 66W वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येते.

नवीन स्मार्टफोनच्या किंमतीबद्दल बोलायचे झाल्यास, Porsche Design Magic 6 RSR ची किंमत 24GB + 1TB व्हेरिएंटसाठी 9,999 युआन (सुमारे 115,200 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 16GB रॅम आणि 512GB स्टोरेजसह Magic 6 Ultimate चे बेस व्हेरिएंट 6,999 युआन (सुमारे 80,600 रुपये) मध्ये खरेदी केले जाऊ शकते. हे स्मार्टफोन भारतात लॉन्च होणार की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

Pune Rave Party : रेव्ह पार्टीत खडसेंचे जावई! खडसेंचा आवाज दाबण्यासाठी बनाव? रेव्ह पार्टीत नेमकं काय घडलं?

Kalyan News : मोठी बातमी! कल्याणमध्ये भर पावसात ५ ते ६ घरे कोसळली, परिसरात खळबळ

SCROLL FOR NEXT