Vivo V30 आणि V30 Pro च्या किमतीत मोठी कपात, हजारोंच्या बचतीसह फोन खरेदी करण्याची संधी

Vivo V30, V30 Pro Price Cut: कमी किंमतीत पॉवरफुल स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. Vivo ने नुकतीच आपली Vivo V30 सीरीज भारतीय बाजारात लॉन्च केली आहे.
Vivo V30 Pro
Vivo V30 ProSaam Tv
Published On

Vivo V30, V30 Pro Price Cut:

कमी किंमतीत पॉवरफुल स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. Vivo ने नुकतीच आपली Vivo V30 सीरीज भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. या सीरीज अंतर्गत कंपनीने दोन स्मार्टफोन Vivo V30 आणि V30 Pro लॉन्च केले होते. या दोन्ही फोनमध्ये जबरदस्त कॅमेरा आणि फीचर्स ग्राहकांना मिळतात.

आता कंपनीने या दोन्ही फोनच्या किमती कमी केल्या आहेत. ग्राहक Vivo चा हा नवीन फोन खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकतात. चला तर जाणून घेऊ Vivo फोनच्या नवीन किंमती आणि त्यावर उपलब्ध असलेल्या सुटबद्दल सविस्तर माहिती... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vivo V30 Pro
Tata Nexon ला टक्कर देणाऱ्या या इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत मोठी घट, फेब्रुवारीत फक्त 83 युनिस्टची झाली विक्री

Vivo V30 स्मार्टफोन तीन व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आले आहेत. ज्यामध्ये 8GB+128GB, 8GB+256GB आणि 12GB+256GB प्रकारांचा समावेश आहे. याच्या 8GB + 128GB व्हेरिएंटची किंमत 33,999 रुपये, 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 35,999 रुपये आणि Vivo V30 च्या 12GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये ठेवण्यात आली आहे.  (Latest Marathi News)

Vivo V30 Pro दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध करण्यात आला होता. ज्यामध्ये 8GB+256GB आणि 12GB+512GB व्हेरिएंटचा समावेश आहे. Vivo V30 Pro स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिएंटची किंमत 41,999 रुपये आहे. तर 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत 46,999 रुपये आहे.

Vivo V30 Pro
24GB RAM, 1 TB स्टोरेज; बेस्ट नाही जबरदस्त आहे 'हा' स्मार्टफोन

इतकी मिळत आहे सूट

कंपनी या दोन स्मार्टफोन्सच्या खरेदीवर सूटही देत ​​आहे. ग्राहक या ऑफरचा लाभ 20 मार्चपर्यंतच घेऊ शकतात. अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक एचडीएफसी, आयसीआयसीआय क्रेडिट आणि डेबिट कार्डसह खरेदी करून हजारो पर्यंत सूट मिळवू शकतात. Vivo V30 चा 8GB RAM / 128GB स्टोरेज असलेल्या फोनवर 3,399 रुपयांची सवलत दिली जात आहे. तर याच्या 8GB RAM / 256GB स्टोरेज असलेल्या फोनवर 3599 रुपयांची सवलत दिली जात आहे. यासोबतच याच्या 12GB RAM / 256GB स्टोरेज असलेल्या फोनवर 3,799 रुपयांची सवलत दिली जात आहे.

V30 Pro च्या 8 GB/256 स्टोरेज असलेल्या फोनवर 4,199 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहेते. तर12 GB RAM / 512 GB स्टोरेज असलेल्या फोनवर 4,699 रुपयांची सूट दिली जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com