Hero Splendor Plus Saam Tv
बिझनेस

Hero Splendor Plusची वाढली मागणी; 30 दिवसांत 3 लाख युनिट्सची विक्री, 75 kmpl मायलेज; किंमत किती?

Best Selling Bike in June: हिरो मोटोकॉर्पच्या स्प्लेंडर प्लसने विक्रीत पुन्हा एकदा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेल्या महिन्यात कंपनीने 3 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री केली आहे.

Satish Kengar

भारतात बजेट बाईकच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. कमी बजेटमध्ये अधिक फीचर्स  आणि जबरदस्त मायलेज, यामुळे ग्राहक दरमहा 100 सीसी ते 125 इंजिन असलेल्या बाईक्स खरेदी करत आहेत. 100cc बाईक सेगमेंटमध्ये बाजारात खूप पर्याय उपलब्ध आहेत. मात्र यात विक्रीच्या बाबतीत Hero MotoCorp च्या Splendor ने सगळ्यांना मागे सोडलं आहे.

Hero Splendor plus ने गेल्या महिन्यात (जून 2024) 3,05,586 युनिट्सची विक्री केली होती, तर मागील वर्षी याच महिन्यात कंपनीने 2,38,340 युनिट्सची विक्री केली होती. याच बाईकच्या किंमत आणि फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

किती आहे किंमत?

हिरो स्प्लेंडर प्लस आजही ग्राहक याच्या साध्या डिझाइनमुळे पसंत करतात. याच्या डिझाइनमध्ये अजूनही कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. स्प्लेंडर प्लसचे वजन 112 किलो आहे. यात 9.8 लीटरची इंधन टाकी आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत 75,441 रुपये ते 89,078 रुपये आहे. दैनंदिन वापरासाठी ही एक चांगली बाईक आहे. 

इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, स्प्लेंडर प्लसमध्ये 97.2cc, सिंगल-सिलेंडर इंजिन आहे. जे 7.9 bhp पॉवर आणि 8.05 Nm टॉर्क जनरेट करते. हे इंजिन 4 स्पीड गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. हे इंजिन इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. इंजिन पॉवर आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत ही एक चांगली बाईक आहे.

73 किमी मायलेज

अलीकडेच स्प्लेंडर प्लसने भारतात 30 वर्षे पूर्ण केली आहेत आणि कंपनीने नवीन ग्राफिक्स आणि फीचर्ससह याचे स्पेशल एडिशन लॉन्च केले आहे. इतकेच नाही तर या बाईकचे मायलेजही वाढवण्यात आले आहे. या एडिशनमध्ये 100cc i3s इंजिन आहे, जे 7.9 bhp पॉवर आणि 8.05Nm टॉर्क जनरेट करते. यात 4 स्पीड गिअरबॉक्स आहे.

ही बाईक एक लिटरमध्ये 73 किमी मायलेज देते, असा कंपनीचा दावा आहे. या बाईकमध्ये पूर्णपणे डिजिटल स्पीडोमीटर आहे. यामध्ये तुम्हाला रियल टाइम मायलेजची माहितीही मिळेल. याशिवाय यात ब्लूटूथ, कॉल, एसएमएस आणि बॅटरी अलर्टची सुविधा आहे. यात यूएसबी पोर्टही आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमचा फोन चार्ज करू शकता. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT