Hero Centennial Bike Saam Tv
बिझनेस

Hero ने लॉन्च केली नवीन कार्बन फायबर बाईक, फक्त 'हेच' लोक खरेदी करू शकतील

Hero Centennial Bike: Hero MotoCorp ने आपली नवीन बाईक The Centennia लॉन्च केली आहे. कंपनी याच्या फक्त 100 युनिट्स विकणार आहे. याचबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

साम टिव्ही ब्युरो

दुचाकी उत्पादक कंपनी Hero MotoCorp ने त्यांचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्या स्मरणार्थ कलेक्टर एडिशन मोटरसायकल 'द सेंटेनियल' लॉन्च करण्याची घोषणा केली. कार्बन फायबरपासून बनवलेल्या या बाइकचे फक्त 100 युनिट्स विकले जातील.

ही घोषणा करताना कंपनीचे कार्यकारी अध्यक्ष पवन मुंजाल म्हणाले, "हिरो मोटोकॉर्पचे संस्थापक अध्यक्ष, माझे वडील डॉ. ब्रिजमोहन लाल मुंजाल यांनी जगभरातील अब्जावधी लोकांना प्रेरणा दिली. भारतीय ऑटोमोबाईल उद्योग आणि भारतीय उद्योगात क्रांती घडवून आणण्यात त्यांची दृष्टी यशस्वी झाली आणि त्यांनी कल्पकता, नाविन्य, धैर्य आणि प्रामाणिकपणाचा वारसा मागे सोडला.

ते म्हणाले, त्याच्यासाठी व्यवसाय फक्त फायद्यासाठी नव्हतं, तर लोक आणि समाज या दोघांसाठी होता. त्यांच्या 101 व्या जयंती उत्सवादरम्यान, ‘The Centennial ’ लॉन्च करताना मला अत्यंत आनंद आणि अभिमान वाटत आहे. ही मोटरसायकल त्याच्या सन्मानार्थ डिझाइन केली आहे.

कंपनीने सांगितले की, 'The Centennial' ही भारतातील हिरो सेंटर फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी (CIT) आणि जर्मनीतील हिरो टेक सेंटर (TCG) मधील जागतिक तज्ञांनी संकल्पना, डिझाइन आणि विकसित केली आहे. हे उत्कृष्ट उत्पादन कंपनीच्या नाविन्यपूर्ण आणि उत्कृष्टतेसाठी बांधिलकी दर्शवते.''

कंपनीने सांगितलं, या हॅण्डमेड बाइकच्या फक्त 100 युनिट्स तयार करण्यात आल्या आहेत. डॉ. ब्रिजमोहन लाल मुंजाल यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त कंपनी या बाइकचा लिलाव आपल्या कर्मचारी, सहयोगी, व्यावसायिक भागीदार आणि भागधारकांना करेल. तसेच यातून जमा झालेला निधी संस्थापकांच्या समुदायाला पाठिंबा देऊन समाजाच्या भल्यासाठी वापरला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

Kalwan Exit Poll: कळवण मतदारसंघातून जे. पी. गावित होणार आमदार? काय सांगतो Exit Poll

Maharashtra Exit Poll: मेहकरमध्ये शिंदे गटाचे संजय रायमुलकर होणार आमदार? पाहा Exit Poll

Maharashtra Exit Poll : कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मंदा म्हात्रे होणार आमदार? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT