Hero Vida V1 Saam Tv
बिझनेस

40000 सूट, 165km रेंज; Hero च्या 'या' इलेक्ट्रिक स्कूटरवर मिळत आहे जबरदस्त दिवाळी ऑफर

Hero Vida V1 Discounts: दिवाळीत तुम्ही नवीन इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

Satish Kengar

दिवाळीच्या निमित्ताने देशातील आघाडीची दुचाकी कंपनी Hero MotoCorp ने आपल्या इलेक्ट्रिक ब्रँड Vida, V1 Plus आणि V1 Pro च्या दोन इलेक्ट्रिक स्कूटरवर जबरदस्त ऑफर दिली आहे. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरवर कंपनी सर्वात मोठी सूट देत आहे.

या दोन्ही स्कूटरमध्ये 2 रिमूव्हेबल बॅटरी आहेत. या दोन्ही स्कूटर्स डिझाईन आणि फीचर्सच्या बाबतीत चांगल्या आहेत. यातच याची रेंज, किंमत, फीचर्स आणि यावर मिळणाऱ्या सुटबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...

काय आहे दिवाळी ऑफर?

Hero Vida V1 Plus ची किंमत 1,02,700 रुपये आहे. तर Vida V1 Pro ची किंमत 1,30,200 रुपये आहे. या दोन्ही स्कूटरवर कंपनी 40,000 रुपयांपर्यंत सूट देत आहे. याशिवाय तुम्हाला Amazon-Flipkart वरून या स्कूटरवर खूप चांगले फायदे मिळतील. येथे तुम्हाला नो कॉस्ट ईएमआयचा लाभ देखील मिळेल. याशिवाय यावरील ईएमआय 5,813 रुपयांपासून सुरू होईल. या सर्व ऑफर्सच्या माहितीसाठी तुम्हाला हिरो डीलरशीपशी संपर्क साधावा लागेल.

किती आहे रेंज?

बॅटरी आणि रेंजबद्दल बोलायचे झाल्यास Hero Vida V1 Plus मध्ये 3.44 kWh बॅटरी आहे. तर V1 Pro मध्ये 3.94 kWh बॅटरी पॅक आहे. दोन्ही प्रकारांमध्ये 6 किलोवॅटची इलेक्ट्रिक मोटर आहे. Vida V1 Plus पूर्ण चार्ज केल्यावर 143km ची रेंज देऊ शकते, असं कंपनीचं म्हणणं आहे. Vida V1 Pro पूर्ण चार्ज केल्यावर 165km ची रेंज देऊ शकते, असंही कंपनीचं म्हणणं आहे. दोन्ही स्कूटरचा टॉप स्पीड 80kmph आहे. दोन्ही स्कूटर एक मिनिट चार्ज करून 1.2 किमी अंतर कापू शकतात, असा दावा कंपनीने केला आहे.

Hero Vida V1 फीचर्स

Hero Vida V1 स्कूटर 2 रिमूव्हेबल बॅटरीसह येतात. याची बॅटरी काढली आणि चार्ज केली जाऊ शकते. या स्कूटरचा टॉप स्पीड तुम्ही वाढवू शकता आणि जास्तीत जास्त 100 किमी प्रतितास पर्यंत नेऊ शकता. यात 7-इंचाची TFT स्क्रीन आहे, जी स्मार्ट कनेक्ट केलेल्या फीचर्ससह येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पंढरपूरात अतिवृष्टीचा अंदाज, सीना नदीला पुन्हा पुराचा धोका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Maharashtra Rainfall: नागरिकांनो सतर्क राहा! आजपासून पाऊस पुन्हा जोर धरणार, कोकण- विदर्भ अन् मराठवाड्यात जोरदार बॅटिंग

Anganwadi Workers: अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार! सरकारकडून भाऊबीज गिफ्ट; २००० रुपये मिळणार

Jio New Recharge Plan: भन्नाट ऑफर! १०० रुपयांत मिळणार हजारो रुपयांचे फायदे; डेटा, मनोरंजन आणि अतिरिक्त ऑफर्स फ्री

Success Story: सरकारी नोकरी सोडली, UPSC परीक्षेत दोनदा फेल, जिद्द नाही सोडली, तिसऱ्या प्रयत्नात IAS; सर्जना यादव यांचा प्रवास

SCROLL FOR NEXT