प्रत्येकाला स्वतः च्या आरोग्याची काळजी असते. त्यामुळे अनेकजण अनेक आरोग्य विमा पॉलिसी घेतात. त्यामुळे उपचार घेण्यासाठी आर्थिक मदत होते. आता हेल्थ इन्शुरन्सबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पॉलिसीधारकांना आता सर्व रुग्णालयांमध्ये कॅशलेश व्यव्हार करता येणार आहे.
पॉलिसीधारकांना आरोग्य विमा पॉलिसीअंतर्गत वेगवेगळे रुग्णालये देण्यात आलेली असतात. याच रुग्णालयात उपचार घेता येतात. या सर्व रुग्णालयात लवकरच कॅशलेश व्यव्हार सुरु होणार आहे. जनरल इन्शुरन्स काउन्सिल (GIC)ने कॅशलेस एव्हरीव्हेअर (Cashless Everywhere) उपक्रमाअंतर्गत नवीन नियम जारी केले आहेत. यामध्ये पॉलिसीधारक त्यांच्या आवडीच्या रुग्णालयात उपचार घेऊ शकता. हे नियम २५ जानेवारी २०२४ पासून लागू झाले आहेत. याबाबत मनी कंट्रोलने वृत्त दिले आहे. (Latest News)
जर तुमची आरोग्य विमा पॉलिसी असेल तर पॉलिसीधारकांना कॅशलेस सुविधेसह आरोग्य विमा पॉलिसीधारकांना उपचारासाठी पैसे देण्याची आवश्यकता नाही. तेथे विमा कंपन्या हॉस्पिटलायझेशनचा खर्च करतील. ज्या हॉस्पिटलमध्ये विमा कंपन्यांचा करार किंवा टाय अप झाले आहे. त्याच हॉस्पिटलमध्ये ही कॅशलेस व्यव्हार करता येणार आहे. ज्या हॉस्पिटलशी विमा कंपन्यांचा करारा नाहीये, त्या हॉस्पिटमध्ये सर्वात आधी पैसे भरावे लागतात, त्यानंतर क्लेम करावा लागतो. त्यामुळे आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते.
अटी
जर रुग्णालयात रुग्णाला दाखल करायचे असेल, तर पॉलिसीधारकाने विमा कंपनीला अॅडमिट होण्याच्या ४८ तास आधी कळवळे पाहिजे. आपत्कालिन परिस्थितीत रुग्णालयात दाखल केल्यास ४८ तासांच्या आत विमा कंपनीला कळवावे लागेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.