लहान मुलांचे Aadhaar Card बनवताना काळजी घ्या, एक चूक अन् सतत माराव्या लागतील आधार सेंटरच्या फेऱ्या

How to make Child Aadhar card : मुल जन्माला आल्यानंतर काही वर्षांनी त्याचे देखील आधार कार्ड बनवले जाते. लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी अगदी कमी कागदपत्रांची आवश्यकता असते.
How to make Child Aadhar card
How to make Child Aadhar cardSaam tv
Published On

Online Aadhar Card Process :

सध्या आधार कार्ड हे सगळ्यात महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. शाळेच्या अॅडमिशनपासून ते बँकेच्या अनेक कामापर्यंत त्याचा वापर होतो. मुल जन्माला आल्यानंतर काही वर्षांनी त्याचे देखील आधार कार्ड बनवले जाते. लहान मुलांचे आधार कार्ड काढण्यासाठी अगदी कमी कागदपत्रांची आवश्यकता असते.

परंतु, आता मोठ्यांसोबत लहान मुलांचे देखील आधार कार्ड देखील काढणे आवश्यक आहे. UIDAI ने म्हटले की, आधार बनवण्यासाठी वयोमर्यादा नाही. म्हणजे तुम्ही जन्मलेल्या बाळाचे देखील आधार कार्ड बनवू शकता.

पाच वर्षापर्यंतच्या मुलांसाठी आधार कार्डचा (Aadhar Card) रंग निळा आहे. या आधार कार्डमध्ये मुलांचे बायोमेट्रिक्स नोंदवले जात नाहीत. बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे स्कॅनिंग केले जात नाही. मूल पाच वर्षाचे झाल्यानंतर याची नोंदणी पुन्हा केली जाते.

1. काळजी काय घ्याल?

मुलांचे (Child) आधार कार्ड बनवताना त्यात हवी असणारी आवश्यक माहिती व्यवस्थित भरा. कोणतीही माहिती चुकीच्या पद्धतीने भरल्यास तुम्हाला सतत आधार केंद्रावर जावे लागेल.

How to make Child Aadhar card
Bank Holiday In February 2024 : फेब्रुवारी महिन्यात ११ दिवस बँका राहाणार बंद, एका क्लिकवर पाहा सुट्टयांची यादी

1. नाव

मुलाचे आधार कार्ड बनवताना त्यांचे नाव योग्यरित्या समाविष्ट करा. नाव आणि आडनाव इत्यादींच्या स्पेलिंगची विशेष काळजी (Care) घ्या. बरेचदा नावात अनेक चूका होतात.

2. पालकांचे नाव

आधार कार्डमध्ये मुलाच्या पालकांचे नाव योग्यरित्या भरा. आडनावाबाबत अनेकदा चूका होतात. जन्मदाखल्यावर गडबडीमुळे नावात चूका होतात. त्यामुळे कागदपत्रे तपासून पाहा.

How to make Child Aadhar card
Gold Silver Rate (26th January 2024): सोन्याच्या भावात वाढ, चांदीही चकाकली; जाणून घ्या मुंबई-पुण्यातील आजचे दर

3. मुलांचे आधार कार्ड बनवाताना

आधार कार्ड बनवताना पत्ता बरोबर टाका. वडिलांच्या आधार कार्डमध्ये फक्त पत्ता नोंदवला जातो आणि त्या संदर्भात फक्त वडिलांची कागदपत्रे मागवली जातात. पण तरीसुद्धा तुम्ही वैयक्तिक माहिती तापासून पाहा.

4. पालकांचे आधार कार्ड

मुलाचे आधार कार्ड बनवताना पालकांचे आधार कार्ड लिंक करणे आवश्यक असते. त्यामुळे पालकांच्या आधारकार्डवरुन मुलांची ओळख पटवता येते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com