Credit Card Saam Tv
बिझनेस

HDFC आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल! ग्राहकांच्या खिशावर परिणाम

HDFC And ICICI Credit Card Rule Change: एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. यामुळे ग्राहकांच्या खिशावर परिणाम होणार आहे.

Siddhi Hande

एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. HDFC आणि ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल झाल्यावर त्याचा थेट परिणाम ग्राहकांच्या खिशावार होणार आहे. १ जुलैपासून या नियमांमध्ये बदल होणार आहेत. त्यामुळे जर तुमच्याकडे एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्ड असेल तर ही बातमी नक्की वाचा.

एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डमधील बदल रेंट पेमेंट, ऑनलाइन गेमिंग आणि वॉलेटमधील पैशांबाबत लागू होणार आहे. याचसोबत इन्श्युरन्स ट्रान्झॅक्शनवर मिळणाऱ्या रिवॉर्ड पॉइंटचीदेखील लिमिट बदलली आहे. आयसीआयसीआयच्या क्रेडिट कार्डच्या नियमांमध्येही बदल होणार आहेत. यामध्ये एअरपोर्ट लाउंज अॅक्सेस, वॉलेटमधील पैसे, ऑनलाइन गेमिंगच्या नियमांचा समावेश आहे.

HDFC च्या क्रेडिट कार्डमध्ये बदल

HDFC च्या ग्राहकांना ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मवर एका महिन्याला जर १०,००० रुपये खर्च करतात तर त्यावर महिन्याला १ टक्के चार्ज द्यावा लागणार आहे. हा चार्ज ४,९९९ रुपयांपेक्षा जास्त नसणार आहे.

याचसोबत जर कोणत्या ग्राहकांना  PayTM, Mobikwik, Freecharge किंवा Ola Money यासारख्या थर्ड पार्टी वॉलेटमध्ये जर तुम्ही १०,००० पेक्षा जास्त रुपये टाकतात तर तुम्हाला १ टक्के चार्ज द्यावा लागणार आहे. जर युटिलिटी पेमेंटवर तुमचा खर्च ५०,००० रुपयांपेक्षा जास्त होतो तर १ टक्के चार्ज द्यावा लागणार आहे.

ICICI च्या नियमांमध्ये बदल

आयसीआयसीआयच्या सर्व्हिस चार्जमध्ये बदल करण्यात आले आहे. यामध्ये कॅश डिपॉझिट, चेक डिपॉझिट करण्यावर किंवा डिमांड ड्राफ्ड किंवा पे ऑर्डर ट्रान्झॅक्शनवर वेगवेगळे चार्ज लागणार आहे. आता ग्राहकांना १ हजारांवर १ रुपये द्यावे लागणार आहे. यावर कमीत कमी ५० आणि जास्तीत जास्त १५००० रुपये चार्ज लागणार आहे. तसेच एटीएमवरील चार्ज वाढणार आहेत. फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी २३ रुपये आणि नॉन फायनान्शियल ट्रान्झॅक्शनसाठी ८.५ रुपये चार्ज लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; वयाच्या ६७ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

School Bus Accident : विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसला अपघात; समोरच्या वाहनाने हुलकावणी दिल्याने बस उलटली, विद्यार्थी जखमी

Today Gold Rate: सोनं खरेदी करण्याची सुवर्णसंधी, १० तोळ्याच्या दरात ६००० रुपयांनी घसरण, आजचे दर किती?

Maharashtra Live News Update: संगमनेरमध्ये स्कूल बसला अपघात

SCROLL FOR NEXT