Petrol Pump UPI Ban: आता पेट्रोल पंपावर UPI पेमेंट बंद; महाराष्ट्रात या ठिकाणी लागू होणार नियम

No UPI Payment On Maharashtra Petrol Pump: सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील काही पेट्रोल पंपावर यूपीआय पेमेंटवर बंदी घातली आहे.
Petrol Pump UPI Ban
Petrol Pump UPI BanSaam Tv
Published On

आजकाल सर्वकाही ऑनलाइन झाले आहे. अगदी भाजी घेण्यापासून ते कोणाला पैसे पाठवायचे असेल तर आपण ऑनलाइन पद्धतीने पाठवू शकतो. पेट्रोल भरल्यानंतरही आपण ऑनलाइन पद्धतीने पेमेंट करतो. परंतु आता तुम्ही आज कोणत्याही पेट्रोल पंपावर यूपीआय पेमेंट करु शकणार नाही. महाराष्ट्रातील अनेक पेट्रोल पंपावर सायबर फसवणुकीचे प्रकार घडले आहे.

Petrol Pump UPI Ban
Petrol Diesel: पेट्रोल डिझेल स्वस्त होण्याची शक्यता, कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण; पाहा आजचे दर

पेट्रोल पंपावर यूपीआय पेमेंट नाही (No UPI Payment on Petrol Pump)

पेट्रोल पंप चालकांच्या संघटनांनी याबाबत माहिती दिली आहे. यामुळे १० मे पासून पेट्रोल पंपावर यूपीआय किंवा इतर डिजिटल पेमेंट घेणे थांबवण्यात आले आहे. हा निर्णय महाराष्ट्रात घेण्यात आला आहे. विदर्भ, नाशिकमध्ये तुम्ही ऑनलाइन पेमेंट करु शकणार नाहीत.

पेट्रोल पंप चालकांच्या म्हणण्यांनुसार, ऑनलाइन व्यव्हारांमुळे सायबर फसवणुकीचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे खूप नुकसान होते. अनेक वेळा लोक इतरांचे कार्ड वापरुन किंवा नेटबँकिंग करुन निघून जातात. यानंतर तक्रार करतात आणि व्यव्हार रद्द करतात. यामुळे पेट्रोल पंप मालकांने खूप नुकसान झाले आहे.यामुळेच हा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत विदर्भ आणि नाशिक पेट्रोल पंप डीलर्सने पुढाकार घेतला आहे. या घटनांमुळे पेट्रोल पंपाचे बँक खातेदेखील ब्लॉक करण्यात आले आहे. यानंतर खाती ब्लॉक झाल्यावर व्यव्हारदेखील होत नाही.यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Petrol Pump UPI Ban
FACT Check: देशभरातील ATM खरंच २ ते ३ दिवस बंद राहणार? काय आहे व्हायरल मेसेज मागचं सत्य

कॅशलेस पेमेंट बंद करण्याची मागणी (Cashless Payment)

सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूरमधील काही पेट्रोल पंप मालकांनी १० मेपासून डिजिटल पेमेंट न स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोल घेण्यासाठी फक्त रोख पैसे स्विकारले जातील, वाढत्या डिजिटल फ्रॉडमुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

Petrol Pump UPI Ban
Post Office Scheme: ११४ महिन्यात तुमचे पैसे होणार डबल; पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळतो जबरदस्त परतावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com