Maharashtra land purchase rules  Saam tv
बिझनेस

जमीन खरेदी-विक्रीचा नवा नियम, आता गुंठ्यांत जमीन घेण्यापूर्वी हे वाचाच, अन्यथा व्यवहार ठरेल बेकायदेशीर

land registration rules : महाराष्ट्रात १ ते ५ गुंठे जमीन खरेदी करण्यापूर्वी विशेष परवानगी आवश्यक आहे. विहीर, शेतरस्ता आणि घरासाठी कमी क्षेत्राची जमीन घेताना कोणते नियम व कागदपत्रे लागतात ते जाणून घ्या.

Namdeo Kumbhar

Maharashtra land purchase rules : तुकडेबंदी कायद्यानुसार जमिनीचे छोटे तुकडे (गुंठावारी) खरेदी-विक्री करण्यावर प्रशासनाचे कडक निर्बंध असतानाच महसूल विभागाने यासंदर्भात महत्त्वपूर्ण आणि स्पष्ट आदेश जारी केले आहेत. आता विहीर, शेतरस्ता, किंवा घरासाठी लहान तुकड्यांत जमीन खरेदी करायची असल्यास विशिष्ट शासकीय नियमांचे आणि परवानग्यांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

योग्य परवानग्या आणि अटींची पूर्तता न केल्यास अशा खरेदी-विक्रीचे दस्त नोंदवले जाणार नाहीत, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या नव्या निर्णयामुळे लहान जमीन खरेदीदारांना मोठा दिलासा मिळणार असला, तरी व्यवहारापूर्वी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. सकाळने याबाबतचे वृत्त दिलेले आहे.

महसूल विभागाच्या नियमांनुसार जमिनीचे छोटे तुकडे खरेदी-विक्री करण्यासाठी स्पष्ट मर्यादा ठरवून देण्यात आल्या आहेत. बागायती जमिनीसाठी किमान १० गुंठे आणि जिरायती जमिनीसाठी किमान २० गुंठे जमीन असणे बंधनकारक आहे. पण जर एखाद्या शेतकऱ्याला घर बांधण्यासाठी, विहीर खोदण्यासाठी किंवा शेतासाठी रस्ता काढण्यासाठी या मर्यादेपेक्षा कमी (१ ते ५ गुंठे) जमीन घ्यायची असेल, तर त्यांना विशेष परवानगीची सोय करण्यात आली आहे.

कमी गुंठे जमीन खरेदी करायची असल्यास काय करावे?

  • प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी जमीन खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला आवश्यक कागदपत्रांसह थेट प्रांताधिकाऱ्यांकडे (SDO) अर्ज करावा लागतो.

  • अर्जाची आणि कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत यासाठीची अधिकृत परवानगी दिली जाते.

  • प्रांताधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय अशा कमी क्षेत्राची दस्तनोंदणी (रजिस्ट्री) होणार नाही.

शेतकऱ्यांची अडचण

प्रांताधिकारी कार्यालयात चकरा माराव्या लागत असल्याने शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाया जात आहे. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेला कंटाळून अनेक शेतकऱ्यांनी खरेदीखत न करता थेट ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर जमीन खरेदी करून विहिरी किंवा घरे बांधली आहेत. असे व्यवहार कायदेशीरदृष्ट्या धोक्याचे ठरू शकतात. ही अडचण दूर करण्यासाठी प्रांताधिकाऱ्यांऐवजी तालुका पातळीवर तहसीलदारांनाच कमी क्षेत्राच्या खरेदी-विक्रीची परवानगी देण्याचे अधिकार द्यावेत, अशी मागणी आता शेतकरी वर्गातून केली जात आहे.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

रस्त्यासाठी : ज्या शेतातून रस्ता जाणार आहे, ती जमीन रस्त्यालगत असणे आवश्यक आहे. संबंधित जमीनमालकाची सहमती घेऊन अर्ज करावा लागतो.

विहिरीसाठी : दोन-तीन गुंठे जमीन खरेदी करायची असल्यास भूजल सर्वेक्षण विभागाची (जीएसडी) परवानगी आवश्यक आहे. विहिरीसाठी जागा खरेदी करणाऱ्या शेतकऱ्याच्या नावावर किमान १० गुंठे जमीन असणे आवश्यक आहे.

घरकुलासाठी : काही गुंठे जमीन खरेदी करायची असल्यास नगररचना विभागाचा (एडीटीपी) दाखला आवश्यक आहे. संबंधित क्षेत्राचे जुने सातबारा उतारेही अर्जासोबत जोडावे लागतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अंतरवाली सराटीच्या वेशीवर ओबीसींचे लाक्षणिक उपोषण

Hair care Tips : केस बांधल्यावर चपटे दिसतात? स्ट्रेटनर-कर्लर न वापरता या ७ ट्रिक्स करा फॉलो; केसांना मिळेल क्लासी व्हॉल्यूम

Signs of dehydration: शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास पहिलं लक्षणं काय दिसून येतं?

Flight Ticket Rate : कोकणवासियांसाठी मोठी खूशखबर! आता विमानाने करा स्वस्त अन् मस्त प्रवास; पाहा काय आहेत तिकिटाचे दर

Ganesh Chaturthi 2026: गणेशोत्सवापूर्वी घरातून बाहेर काढा 5 वस्तू; नकारात्मक उर्जा दूर होऊन घर होईल शुद्ध

SCROLL FOR NEXT