Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण' योजनेची नवीन नोंदणी अन् e-KYC सुरू? 'या' व्हायरल मेसेजमागचं धक्कादायक सत्य आलं समोर

Ladki Bahin Yojana Fact Check update : लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी आणि e-KYC सुरू झाल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. मात्र महिला व बालविकास विभागाने असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana
Published On

Ladki Bahin scheme viral message fact check : 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेसाठी नव्याने अर्ज प्रक्रिया आणि e-KYC सुरू झाल्याचा एक मेसेज सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. 'yojana.list' या खात्यावरून हा दावा केला जात असून अडकलेले हप्ते पुन्हा सुरू करण्यासाठी फॉर्म भरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

व्हायरल मेसेजमध्ये नेमका काय दावा केला जातोय?

इन्स्टाग्रामवरील या मेसेजमध्ये म्हटले आहे की, "लाडकी बहीण योजनेची नवीन नोंदणी सुरू झाली आहे. तुमची KYC राहिली असेल किंवा हप्ते येणे बंद झाले असेल, तर 'jobsvalaa' या लिंकवर जाऊन लगेच नवीन अर्ज करा." त्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड, महाराष्ट्राचे रहिवासी प्रमाणपत्र, बँक खाते आणि फोटो यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे मागितली जात आहेत.

Ladki Bahin scheme viral message fact check
Ladki Bahin scheme viral message fact check
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: गणेशोत्सवात लाडकींच्या खात्यात येणार ₹3,000? लाडकी बहीण योजनेची मोठी अपडेट समोर

महिला व बालविकास विभागाकडून मोठे स्पष्टीकरण

याबाबत 'साम टीव्ही मराठी'ने महिला आणि बालविकास विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी थेट चर्चा केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शासनाकडून नव्याने नोंदणी किंवा e-KYC सुरू करण्याचा असा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, तसेच यावर कोणतीही चर्चा झालेली नाही. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे अथवा मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्र्यांकडून यावर कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. हा मेसेज निव्वळ अफवा असून नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी पसरवला जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : सप्टेंबर सुरू झाला, ऑगस्टचा १५०० रुपयांचा हप्ता कधी जमा होणार? तारीख आली समोर

सायबर चोरट्यांचे जाळे, बँक खाते रिकामे होण्याचा धोका!

लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ची शेवटची तारीख ३१ मार्च होती. त्याशिवाय नवीन नोंदणी पूर्णपणे बंद आहे. अशा अनधिकृत लिंक्सवर जाऊन आपली वैयक्तिक माहिती, आधार कार्ड किंवा बँक खात्याचा तपशील शेअर केल्यास महिलांचे बँक खाते रिकामे होऊ शकते अथवा ही गोपनीय माहिती सायबर चोरट्यांच्या हाती जाऊ शकते.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी जमा होणार? तारीख आली समोर

साम टीव्हीचे आवाहन:

राज्यातील लाडक्या बहिणींनी अशा कोणत्याही बनावट आमिषांना व व्हायरल मेसेजला बळी पडू नये. वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी वेबसाइट किंवा लिंकवर भरू नये, असे आवाहन 'साम टीव्ही मराठी'कडून करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com