

Ladki Bahin August installment date : सप्टेंबर महिन्याला सुरुवात झाली आहे, मात्र 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याबाबत लाडक्या बहिणींमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. यापूर्वी राज्य सरकारने रक्षाबंधनाच्या शुभमुहूर्तावर पात्र महिलांच्या बँक खात्यात जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा सन्माननिधी जमा केला होता. या लाभानंतर आता ऑगस्ट महिन्याचे १५०० रुपये खात्यावर कधी वर्ग होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गणेशोत्सवाच्या काळात पैसे मिळण्याची शक्यता
येत्या १४ सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबरनंतर ऑगस्ट महिन्याचा सन्माननिधी महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया थेट सुरू केली जाऊ शकते. हा निधी टप्प्याटप्प्याने डीबीटीद्वारे (DBT) सर्व पात्र महिलांच्या थेट बँक खात्यात वर्ग केला जाणार आहे.
१ कोटी ६६ लाख लाभार्थी महिलांना लाभ
राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेचा लाभ राज्यातील सुमारे १ कोटी ६६ लाख पात्र लाडक्या बहिणींना मिळणार आहे. निधी वितरणासाठी आवश्यक असलेली प्रशासकीय तयारी पूर्ण केली जात आहे. पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठीचा आवश्यक निधी अधिकृतपणे मंजूर केला जाऊ शकतो, अशी माहितीही समोर आली आहे.
अशा प्रकारे वितरित होणार पैसे
प्रक्रिया कधी सुरू होणार: १६ सप्टेंबरनंतर टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्यास सुरुवात.
एकूण लाभार्थी: १ कोटी ६६ लाख पात्र महिला.
हप्त्याची रक्कम: प्रति महिना १,५०० रुपये.
खात्याची स्थिती: आधार आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक.
राज्य सरकारने गौरी गणपतीच्या उत्सवात १५०० रूपयांचा हप्ता जमा केला तर महिलांना मोठी आर्थिक मदत मिळणार आहे. सणाचा आनंद द्विगुणित होणार आहे. त्यामुळे आता केवळ आगामी मंत्रिमंडळ बैठकीतील मंजुरी आणि १६ सप्टेंबरच्या प्रक्रियेकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.