GST RATE CUT COMBINED WITH AMAZON-FLIPKART SALE BRINGS BIG SAVINGS 
बिझनेस

Mega Sale 2025: डबल धमाका! एकीकडे GST कपात आणि दुसरीकडे अमेझॉन-फ्लिपकार्ट विक्री, सवलतींचा दुप्पट फायदा

Shopping Deals: २२ सप्टेंबरपासून नवीन जीएसटी दर लागू झाल्यामुळे इलेक्ट्रॉनिक्ससह अनेक वस्तू स्वस्त होतील. २३ सप्टेंबरपासून अमेझॉन-फ्लिपकार्ट सेलमध्येही चांगल्या डील्स मिळतील, ग्राहकांना दुप्पट सवलतींचा फायदा होईल.

Dhanshri Shintre

  • जीएसटी दर कमी झाल्याने इलेक्ट्रॉनिक्स व घरगुती उपकरणांमध्ये मोठी दरकपात.

  • Amazon व Flipkart सेलमुळे ग्राहकांना दुप्पट बचतीची संधी.

  • स्मार्टफोनवर बंपर ऑफर्स पण जीएसटी दरात बदल नाही.

  • खरेदीदारांना सेल व जीएसटी दोन्हीमुळे हजारो रुपयांचा थेट लाभ.

२२ सप्टेंबरपासून कमी करण्यात आलेल्या जीएसटी दरांचा थेट लाभ ग्राहकांना मिळू लागला आहे. इलेक्ट्रॉनिक्ससह अनेक उत्पादनांच्या किंमतींमध्ये घट झाल्यानं ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर २३ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या Amazon आणि Flipkart च्या सेलमध्येही खरेदीदारांना दुप्पट फायदा होणार आहे. एका बाजूला वस्तूंच्या मूळ किमतीत जीएसटी कपतीमुळे घट झाली आहे, तर दुसऱ्या बाजूला ऑनलाइन सेलमुळे आकर्षक ऑफर्स आणि सवलती उपलब्ध आहेत.

रविवारी संध्याकाळी पंतप्रधानांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले आणि २२ सप्टेंबरपासून "जीएसटी बचत महोत्सव" सुरू होणार असल्याची घोषणा केली. सरकारच्या या निर्णयामुळे जवळपास ९९% दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील जीएसटी दर कमी करण्यात आले आहेत. यात यूएचटी दूध, ब्रेड, आईस्क्रीम यांसारख्या अन्नपदार्थांचा समावेश असून, घरगुती इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या किंमतींवरही मोठा परिणाम होणार आहे. टेलिव्हिजन, एअर कंडिशनर आणि डिशवॉशिंग मशिनवरील जीएसटी दर २८% वरून थेट १८% करण्यात आल्याने ग्राहकांना लक्षणीय बचत होईल.

उदाहरणार्थ, एअर कंडिशनरची मूळ किंमत ४०,००० रुपये असल्यास, Amazon किंवा Flipkart वरच्या २०% सवलतीमुळे किंमत ३२,००० रुपये होईल. या नवीन दरावर १८% जीएसटी लागू होत असल्याने अंतिम किंमत ३७,७६० रुपये ठरेल. पूर्वी हीच किंमत २८% जीएसटीमुळे ४०,९६० रुपये इतकी होती. अशा प्रकारे खरेदीदारांना हजारो रुपयांची थेट बचत संभवणार आहे.

ऑनलाइन सेलमध्ये स्मार्टफोनसाठीही बंपर ऑफर्स जाहीर करण्यात आल्या आहेत. Samsung, Apple iPhone, Google Pixel, Realme आणि Xiaomi Redmi स्मार्टफोनवर विशेष सवलती देण्यात येत आहेत. मात्र स्मार्टफोनवरील जीएसटी दरात बदल करण्यात आलेला नाही. तरीही सेल कालावधीमध्ये अनेक बँक ऑफर्स, एक्सचेंज बोनस आणि नो-कॉस्ट ईएमआय पर्यायांमुळे ग्राहकांना चांगला फायदा मिळू शकतो.

या सेलदरम्यान ग्राहकांना घरगुती उपकरणे, किचन अॅप्लायन्सेस आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवरही आकर्षक सवलती मिळणार आहेत. कंपन्यांनी आधी जाहीर केलेल्या ऑफर्सनुसार वॉशिंग मशिन्स, मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर-ग्राइंडर आणि इतर अनेक उपकरणांवर दरकपात होणार आहे. जीएसटी कपातीमुळे यांचे दर आधीच कमी झाले असल्याने हा सेल खरेदीसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे.

या सेलदरम्यान ग्राहकांना घरगुती उपकरणे, किचन अॅप्लायन्सेस आणि दैनंदिन वापराच्या वस्तूंवरही आकर्षक सवलती मिळणार आहेत. कंपन्यांनी आधी जाहीर केलेल्या ऑफर्सनुसार वॉशिंग मशिन्स, मायक्रोवेव्ह ओव्हन, मिक्सर-ग्राइंडर आणि इतर अनेक उपकरणांवर दरकपात होणार आहे. जीएसटी कपातीमुळे यांचे दर आधीच कमी झाले असल्याने हा सेल खरेदीसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे.

जीएसटी दर कपातीमुळे कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक परिणाम झाला?

टेलिव्हिजन, एअर कंडिशनर आणि डिशवॉशिंग मशीनवरील जीएसटी २८% वरून १८% पर्यंत कमी झाल्यामुळे त्यांचे दर मोठ्या प्रमाणात घटले आहेत.

ऑनलाइन सेलमधील ग्राहकांना काय फायदा मिळणार आहे?

ग्राहकांना जीएसटी कपातीसोबत Amazon आणि Flipkart च्या सेलमुळे दुप्पट सवलती मिळतील.

स्मार्टफोनवरील जीएसटी दर कमी झाले आहेत का?

नाही, स्मार्टफोनच्या जीएसटी दरात बदल नाही, पण तरीही सेलमध्ये बंपर ऑफर्स आणि बँक ऑफर्स उपलब्ध आहेत.

एअर कंडिशनरच्या किंमतीत किती बचत होऊ शकते?

उदाहरणार्थ, ₹४०,००० किंमतीच्या एसीवर २०% सूट आणि १८% जीएसटी लावल्यानंतर अंतिम किंमत ₹३७,७६० होते, जी पूर्वीपेक्षा हजारो रुपयांनी स्वस्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंब्रातील गावदेवी बायपास येथे कंटेनरखाली येऊन ३ मुलांचा मृत्यू

Heart blockage: हार्ट ब्लॉकेज होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; सामान्य समजून लोकं करतात इग्नोर

Beed Cloudburst: बीडमध्ये अचानक ढगफुटी; 25-30 गावांचा संपर्क तुटला|VIDEO

Mumbai Accident: मुंबईत अपघाताचा थरार, ७ ते ८ वाहनं एकमेकांना धडकली; पाहा VIDEO

Devgad Fort History: सिंधुदुर्गच्या अरबी किनाऱ्यावर वसलेला देवगड किल्ला, जाणून घ्या वास्तूकलेचे इतिहास आणि वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT