Dual SIM Recharge: ड्युअल सिम यूजर्ससाठी दिलासा! सेकंडरी सिम कायम ठेवा सक्रिय, Jio-Airte-Vi चे जबरदस्त रिचार्ज प्लॅन

Affordable Recharge Plans: ड्युअल सिम यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही तुमचे सेकंडरी सिम सहजपणे सक्रिय ठेवू शकता. जिओ, एअरटेल आणि व्हीआयचे किफायतशीर रिचार्ज प्लॅन अमर्यादित कॉलिंग आणि मोफत SMS सुविधेसह उपलब्ध आहेत.
Dual SIM Recharge: ड्युअल सिम यूजर्ससाठी दिलासा! सेकंडरी सिम कायम ठेवा सक्रिय, Jio-Airte-Vi चे जबरदस्त रिचार्ज प्लॅन
Published On

ड्युअल सिमचा वापर

भारतातील बहुतांश मोबाईल यूजर्स ड्युअल सिमचा वापर करतात. वैयक्तिक आणि व्यावसायिक गरजांसाठी स्वतंत्र सिम आवश्यक असते. दोन सिम वापरणाऱ्यांसाठी आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

दोन सिमसाठी रिचार्ज करणे

पूर्वी रिचार्ज प्लॅन स्वस्त असल्यामुळे दोन सिमसाठी रिचार्ज करणे सहज शक्य होत होते. मात्र, खाजगी कंपन्यांनी दर वाढवल्याने दरमहा दोन नंबर टिकवणे आता मोबाईल यूजर्ससाठी आर्थिक ओझं ठरत आहे.

मोबाइल रिचार्जच्या किंमतीत वाढ

मोबाइल रिचार्जचे दर वाढल्यामुळे अनेकजण फक्त प्रायमरी नंबर चालू ठेवतात, तर सेकंडरी नंबर निष्क्रिय होतो. पण आता काळजीची गरज नाही. सेकंडरी सिमही सोप्या पद्धतीने रिचार्ज करून वापरता येणार आहे.

काही स्वस्त रिचार्ज प्लॅन

आज आम्ही तुम्हाला जिओ, एअरटेल आणि व्हीआयचे काही स्वस्त रिचार्ज प्लॅन सांगणार आहोत. हे प्लॅन तुमचे सेकंडरी सिम सक्रिय ठेवतील आणि इनकमिंग-आउटगोइंग सेवा सुरू राहतील, त्यामुळे नंबर बंद होण्याची भीती उरणार नाही.

जिओचे सेकंडरी सिम रिचार्ज प्लॅन

जर तुमच्याकडे जिओचे सेकंडरी सिम असेल, तर कंपनीचा ₹४४८ चा प्लॅन तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. यात ८४ दिवसांची वैधता, अमर्यादित कॉलिंग आणि १,००० मोफत एसएमएस मिळतात. मात्र, या प्लॅनमध्ये डेटा समाविष्ट नाही.

एअरटेलचे सेकंडरी सिम रिचार्ज प्लॅन

जर तुम्ही एअरटेलचे सेकंडरी सिम वापरत असाल, तर ४६९ रुपयांचा प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि ९०० मोफत एसएमएसची सुविधा मिळते.

व्होडाफोन आयडिया सेकंडरी सिम रिचार्ज प्लॅन

व्होडाफोन आयडिया यूजर्ससाठी ४७० रुपयांचा खास प्लॅन उपलब्ध आहे, जो सेकंडरी सिम सक्रिय ठेवण्यासाठी उत्तम ठरतो. या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची वैधता, सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि ९०० मोफत एसएमएसचा लाभ मिळतो.

किफायतशीर वार्षिक प्लॅन

जर तुम्ही जिओ, एअरटेल किंवा व्होडाफोन आयडियाचे किफायतशीर वार्षिक प्लॅन शोधत असाल, तर जिओकडे ₹१,७४८ चा, एअरटेलकडे ₹१,८४९ चा आणि व्होडाफोन आयडियाकडे देखील ₹१,८४९ चा प्लॅन उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com